Nana Patole On Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचा काँग्रेसला संपवण्याचा प्लॅन होता, असा मोठा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलंय, अशी सडकून टीका अशोक चव्हाणांनी केली. चव्हाणांच्या याच टीकेनंतर नाना पटोले यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …
नाना पटोले म्हणाले, अशोक चव्हाण यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर बोलणं टाळावं. त्यांनी काँग्रेसच्या नावाने खूप कमावलं आहे, तसेच खूप राज्य भोगलं. काँग्रेसला कसं संपवायचं? हा प्लॅन त्यांनी केला होता बरं झालं ते आपल्यात नाहीत, त्यांनी आता काँग्रेसवर बोलणं टाळलं पाहिजे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी चिन्हापासूनच ‘वंचित’ ! राज्यभरात वेगवेगळ्या चिन्हावर मते मागावे लागणार
तसेच यावेळी बोलताना नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांना खोचक सल्लाही दिला आहे. ते म्हणाले, ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, मोठं केलं त्याचं आईची बदनामी तुम्ही करत असाल तर लोकं तुम्हाला पाप करणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
आंबेडकरांनाच युती नको होती…
निवडणुकीत मतांच विभाजन होऊ नये म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चेत पुढे गेलो होतो. आंबेडकरांनी आमची वारंवार चेष्टा केली, दोन तीन महिने मीडियावर चेष्टा दाखवली होती. तरीही आम्ही तयार होतो पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे केले आहेत, याचा अर्थ त्यांनाच मैत्री नको होती, हे त्यातून सिद्ध होत आहे. त्यांनाच युती करायची नव्हती म्हणूनच त्यांनी उमेदवार जाहीर केले असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.