Download App

‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं

Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.

Thane News : ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब? पोलिसांना मिळाला मेल; बॉम्बस्कॉड घटनास्थळी

राहुल गांधी म्हणाले, भारतात आधी राजेशाही होती. देशात 500 ते 600 संस्थाने होती. या संस्थानांच्या माध्यमातून देशातील जनतेचा कारभार चालवला जात होता. त्यानंतर इंग्रज आले. इंग्रजांची आणि राजे महाराजांची भागीदारी होती. देशातल्या जनतेला सोबत घेऊन काँग्रेसने देशात स्वांतत्र्यासाठीचा लढा उभा केला. त्यानंतरच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. भारताला स्वातंत्र्या राजेमहाराजांमुळे नाहीतर इथल्या जनतेचा लढा काँग्रेसने उभा केल्यामुळेच मिळालं असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.

Horoscope Today: कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मिथुन राशीचा आजचा दिवस

तसेच स्वातंत्र्यपूर्वकाळात जशी परिस्थिती देशाची होती अगदी तशीच परिस्थिती आज भाजपची देशात आहे. भाजपने आणि आरएसएसच्या लोकांनी स्वातंत्र्यानंतरही कित्येक वर्ष भारताचा तिंरगा ध्वजाला कधी वंदनही केलं नव्हतं, हे भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेम असल्याचं राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं आहे. देशातील जनतेला कोणतेही अधिकार नव्हते, जनतेला अधिकार देण्याच्या विरोधात भाजप आणि आरएसएसची विचाराधारा होती, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला आहे. आता पुन्हा एकदा जुन्या भारताकडे भाजप घेऊन जात असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

स्वकर्तृत्वावर तयार झालेले पवार अन् काकांच्या सावलीत वाढलेल्या दादांमध्ये मोठं अंतर, आव्हाडांचा हल्लाबोल…


90 टक्क्यांमध्ये ओबीसी विचारताच भाजपचं मौन :

संपूर्ण भारताला 90 आयएएस अधिकारी चालवतात. हेच अधिकारी संपूर्ण बजेटचं वाटप करीत असतात. या 90 टक्के अधिकाऱ्यांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी किती आहेत? असा सवाल संसदेत उपस्थित करताच भाजपच्या लोकांनी मौन बाळगलं असल्याचंही राहुल गांधींनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

कुणाचं ऐकणं हे मोदींच्या स्वभावात नाही :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वभावात कुणाचं ऐकूण घेणं नाही. पंतप्रधान मोदींना कुणीही प्रश्न विचारलेलं आवडत नाही. नाना पटोलेंनीही प्रश्न विचारले होते. त्यामुळेच त्यांना भाजपकडून बाहेर आऊट केलं आहे. भाजपचा कोणताही कार्यकर्ता मोदींना काही सांगू शकत नाही. माझं चुकलं तर कार्यकर्ते मला सांगतात. मी कार्यकर्त्यांच्या मताचा मान ठेवतो, अशी खोचक टीकाही राहुल गांधींनी मोदींवर केली आहे.

follow us