Download App

‘साखरपुडा झाला पण, लग्न झालं नाही, हातकणंगलेची चर्चा कुठं अडली?’ सतेज पाटलांनी काय सांगितलं?

Congress MLA Satej Patil on Hatkanangale Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर (Uddhav Thackeray) त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र, राजू शेट्टींच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत असे सांगत सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आता राजू शेट्टी यांनीही मशाल चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिला. या घडामोडी घडल्यानंतर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी (Satej Patil) भूमिका स्पष्ट केली.

Raju Shetty : लोकसभेसाठी आमचे सहा जागांवर लक्ष; राजू शेट्टींच्या स्वबळाच्या नाऱ्याचा फटका कुणाला बसणार?

सतेज पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, हातकणंगलेची जागा ठाकरे गटाची होती आणि त्यांनी तो निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा होती. राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती मात्र त्या चर्चेला अंतिम स्वरूप मिळालेलं नाही. त्यांनी त्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे आता आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाऊ. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकत या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातील सर्व नेत्यांना एकत्र करून बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवू, असे पाटील म्हणाले.

राजू शेट्टी आमच्या बरोबर यावेत ही आमची प्रामाणिक भूमिका होती. ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला होती जर काँग्रेसकडे असती तर आम्ही सर्वांना विचारून त्वरित निर्णय घेतला असता. स्वाभिमानी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला मात्र लग्न जमलं नाही. मात्र यामुळे मतविभागणीचा फटका कोणाला बसेल हे अद्याप सांगता येणार नाही. महाविकास आघाडीची या मतदारसंघात मोठी ताकद आहे. मात्र जागा लढवायची नाही म्हणून ही ताकद आजपर्यंत रस्त्यावर आली नव्हती आता निर्णय झाला आहे आता ही ताकद रस्त्यावर उतरेल, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं

follow us