Deepak Kesarkar : आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) त्यांचे वडील उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते कॉंग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळं युती तुटली, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. ते शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शालेय गणवेशात केसरकारांनी मलाई खाल्ल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर देतांना केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली.
तू मायके चली जाएगी, तो मैं डंडा लेके आऊंगा…; जयंत पाटलांची शिंदे-फडवीसांवर टोलेबाजी
पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात वक्तव्य काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते, ही शिवसेनेची ताकद होती. मात्र, याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरेंच्या पोरकटपणामुळं घडले आहे. त्यांनी लोकांमध्ये जायला शिकलं पाहिजे, त्यांनी स्वतमध्ये सुधार करावी, असा वडीलकीच्या नात्याने मी सल्ला देतो.
गणवेशात पैसे खाल्ल्याचे आरोप फेटाळले…
आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपाविषयी बोलतांना ते म्हणाले, मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षणमंत्री आहे, ज्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. मुले अनवाणी शाळेत जात होते, म्हणून त्यांना शूज व मोजे देण्याचा निर्णय घेतला. शालेय गणवेशाची निविदा138 कोटी रुपयांची होती. यापूर्वी केवळ मागासवर्गीय विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनींनाच गणवेश दिले जात होते. या निविदेत राज्य सरकारचे सुमारे 11 कोटी रुपये वाचले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ ही एक सरकारी संस्था आहे. त्याना हे काम देण्यात आलं. यात 20 हजार महिला गणवेश शिवण्याचे काम करतात, त्यांना याचा अनुभव नव्हता. त्याच्यामुळं कदाचित गणवेश शिवण्याला उशीर झाला असावा, असं सांगत केसरकरांनी त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लागले. तसेच आदित्य ठाकरे यांनी सर्व पुरावे तपासून बोलावे असेही ते म्हणाले.
Kriti Senon : क्रितीचा सेनॉनचा खास इंडियन लूक
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
गणवेश वाटपासंदर्भातील जुना निर्णय शासनाने रद्द केला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यात तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गैरव्यवहार केला आहे. यातील भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. ही अनियमितता प्रशासकीय आहे की आर्थिक स्वरुपाची हे तपासायला हवं. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय गणवेशही सोडला नाही. त्यातून मलाई खाणयाचा प्रयत्न केला, असा फआरोप आदित्य ठाकरेंनी केला.