आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार, निवडणूक लागताच आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार, निवडणूक लागताच आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Aaditya Thackeray News : संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान (Assembly Election) पार पडणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत दंड थोपटले आहेत. आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याचं ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान एकाच टप्प्यात पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक जाहीर होताच सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाल्याची परिस्थिती असतानाच आदित्य ठाकरे यांनी आता राज्यातील जनताच न्याय देणार असल्याचं स्पष्ट केलंय.

VIDEO : निवडणूक आयुक्तांचं EVM बाबत मोठं विधान म्हणाले, “ईव्हीएमध्ये कोणतीही..”

आदित्य ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले,आपण सर्व महाराष्ट्रात ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो २० नोव्हेंबर आहे. या दिवशी मतदान होणार आहे. एकनाथ शिंदे-भाजप सरकार हटवून महाविकास आघाडीला बदल घडवायचा आहे. या सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राची लूट केली आहे. न्यायाची वाट पाहिली पण आता मतदारच न्याय करतील. जय महाराष्ट्र! , असं पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत.

“मीच महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणणार”, पक्षाची सूत्रे स्वतःच्याच हाती ठेवण्याचे पवारांचे स्पष्ट संकेत

दरम्यान, 22 ऑक्टोबरपासून विधानसभेसाठी अर्ज भरण्यासाठी सुरु होणार असून उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. तर 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube