तू मायके चली जाएगी, तो मैं डंडा लेके आऊंगा…; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांवर टोलेबाजी

  • Written By: Published:
तू मायके चली जाएगी, तो मैं डंडा लेके आऊंगा…; जयंत पाटलांची शिंदे-फडणवीसांवर टोलेबाजी

Maharashtra Politics : महायुत (Mahayuti) सरकारचा 15 डिसेंबरला नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) झाला. आता मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी अद्यापही सर्वच मंत्री बिनखात्याचे दिसतात. महायुती सरकार स्थापन होतांना शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं. आता मलाईदार खात्यासाठी महायुतील घटकपक्षात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यावरून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर फटकेबाजी केली.

Kriti Senon : क्रितीचा सेनॉनचा खास इंडियन लूक 

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी सदनात बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, हिवाळी अधिवेशन संपत आलं, पण अद्याप खातेवाटप झालं नाही. महायुतीच्या घटक पक्षांत नाराजी नाट्य सुरू आहे, अशा बातम्या आहेत. खरंतर ध्यानीमनी नसतांना एवढं मोठं यश महायुतीला मिळालं. चुटकीसरशी सरकार स्थापन होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. कारण, महायुतीला 237 आमदारांचा पाठिंबा होता. मात्र, सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लीला जायला लागली होती, कुणी तर थेट स्वत:च्या गावाला निघून गेले होते, अशी शब्दात त्यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला.

“फडणवीस हेच मंत्री, बाकी सर्व बिनखात्याचे मंत्री”, ठाकरेंच्या आमदारांंचा खोचक टोला 

महायुतीच्या नेत्यांमधील नाराजीनाट्यात बरेच दिवस गेले. मला बॉबी नावाचा ऋषी कपूरचा सिनेमा आठवतो. त्यातील एका गाण्यात नायका-नायिका यांच्यातील रुसवा फुगवा आहे. तसा रुसवा फुगवा सरकारमध्ये दिसला. नायिका म्हणते, मै मायके चली जाऊंगी… नायक म्हणतो, मै डंडा लेके आऊंगा… तू डंडा लेकर आऐगा, मै कुए में गिर जाऊंगी.. मै रस्सी से खिसवाऊगा, मैं पेड मे चढ जाऊंगी… मै आरी से कटवाऊंगा… मैं मायके चली जाऊंगी… शेवटी नायक म्हणतो, मै दुजा ब्याह रचाऊंगा… तेव्हा मैं मायके नही चली जाऊंगी, असं नायिका म्हणते. तसं काहीसं राज्यात चालू होतं. शेवटी माहेरी कुणी गेलं नाही, आणि एकदाचं सरकार स्थापन झालं.

फडणवीस एकटे सरकार चालवतील…
15 तारखेला महायुतीचा शपविधी सोहळा झाला. आज 21 डिसेंबर आहे. अधिवेशनही संपतं आलं, पण मंत्र्यांना ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, हेच ठाऊक नाही. सगळ्या चर्चांचे उत्तर मुख्यमंत्री देतात. त्याचा दुसरा अर्थ असा की, तुमच्या कुणाचीही गरज नाही, हे सागण्यासाठी अधिवेशनाचा वापर झाला, तुम्ही नसले तरी सरकार चालणार, हे फडणवीसाना दाखवून दिलं, असं पाटील म्हणाले.

ते म्हणाले, महाराष्ट्र आता थांबणार नाही, असं सरकारचं ब्रिदवाक्य आहे. हे 2014 च्या भाजपच्या जाहिनाम्यातील वाक्य आहे. त्यावेळी 3 लाख कोटींचं कर्ज होतं. आज सरकावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे. एमआयडीसीची ताकद वाढवली जाईल, अशी आश्वासने दिली गेली. मात्र, राज्यातील उद्योग आणि कंपन्या बाहेर जात आहेत, अशी टीका करत महायुतीच्या कार्यकाळात टोलमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, मराठी शाळा, महिला सुरक्षितता या मुद्द्यांवर सरकारने काम करावं, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube