Download App

Dombivli Assembly Constituency : रविवार ठरला प्रचार दिवस; रविंद्र चव्हाणांचा थेट नागरिकांशी संवाद

आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या लोकसेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला चव्हाण हे उपस्थित होते.

  • Written By: Last Updated:

Dombivli Assembly Constituency: डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे (Dombivli Assembly Constituency) आमदार व सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांनी (Ravindra Chavan) रविवारी मतदारसंघात जोरदार प्रचार केला. मंत्री चव्हाण व कार्यकर्ते यांनी थेट मतदारसंघातील जनतेशी संवाद साधला. तसेच रविवारी महायुतीचा कार्यकर्ताचा मेळावाही झाला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने कार्यरत झाले आहेत. याच निमित्ताने आपल्या डोंबिवलीतील मॉडर्न हायस्कूल येथे महायुतीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी सर्वांनी मिळून एकजुटीने महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय करू, असा संकल्प डोंबिवलीकरांनी केला. महायुतीमुळेच महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहत आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने महायुतीचा विजय होईल, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजप ‘राष्ट्र प्रथम’ मंत्रावर वाटचाल करणाऱ्या देशभक्तांचा परिवार; रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीच्या लोकसेवा समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला चव्हाण हे उपस्थित होते. डोंबिवलीकरांचं प्रेम, आशीर्वाद आणि साथ नेहमीच बळ देते. या मेळाव्यात सर्वांनी पुन्हा एकदा डोंबिवलीत कमळ फुलवून महायुतीला विजयी करण्याचा संकल्प केलाय, असे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी महापौर विनिता राणे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, बाळा परब, सुजित नलवडे, कृष्णा पाटील तसेच महायुतीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयी गुलाल आपलाच, कोकणात महायुतीच जिंकणार, रविंद्र चव्हाणांना विश्वास

चव्हाण यांनी अंबर विस्टा सोसायटीला, ठाकुर्ली येथील सनशाईन सोसायटीच्या नागरिकांची भेट घेतली. 15 वर्षांपूर्वी डोंबिवलीचा विकास आणि नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत डोंबिवली शहर आणि डोंबिवलीकरांच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्न करत आहे. #DombivliFirst हेच माझे उद्दिष्ट आहे. या निवडणुकीतही डोंबिवलीकर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. डोंबिवलीत महायुतीचे कमळच फुलणार, असे चव्हाण म्हणाले. शास्त्रीनगर येथील कार्यालयात महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विविध सोसायटी तसेच मंडळांसह बैठक संपन्न झाली. यामध्ये एकवीरा मित्र मंडळ, मास्टर्स मित्र मंडळ, शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळ, शाहू सावंत प्रतिष्ठान, पॅकर्स मित्र मंडळ आदी सोसायटी आणि मंडळांचा समावेश होता. यावेळी उपस्थितांनी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. चव्हाण यांनी भंडारी समाजबांधवांशी संवाद साधला. याप्रसंगी भंडारी समाज मंडळाने मनापासून स्वागत करत विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दिला.

follow us