Download App

तरुणाने ईव्हीएम मशीनवर घातला कुऱ्हाडीचा घाव! म्हणला, संविधान वाचवण्यासाठी…

आपण संविधान वाचवत आहोत असं म्हणत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रावर जाऊन संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं.

  • Written By: Last Updated:

EVM Machine Broken In Nanded : ईव्हीएम मशीनवर गेली अनेक दिवसांपासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामध्ये सुरूवातीला विरोधकांनी अक्षेप घेतला होता. परंतु, त्यानंतर हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. (EVM Machine) आता सामान्य नागरिकांपर्यंत ईव्हीएम मशीनवर शंका घेतल्या जात आहेत. सरकारकडून गावागावात आणि शहरांमध्ये ईव्हीएम मशीनची प्रात्यक्षिकंही दाखवण्यात आली होती. परंतु, नागरिकांमध्ये या ईव्हीएम मशीनबद्दल शंका कायम आहे. आज लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा झाला. दरम्यान, नांदेडमध्ये एका संतप्त तरुणाने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली आहे.

 

Nanded Market Committee Election: भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीमध्ये ‘मविआ’चा विजय

पोलिसांनी ताब्यात घेतलं

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावरून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका संतप्त तरुणाने मतदान केंद्रावर जाऊन 103 क्रमांकाची व्हीव्हीपॅट मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीने फोडून टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी त्याने आपण हे संविधान वाचवण्यासाठी कृत्य केल्याचं ओरडून सांगितलं. भानुदास एडके असं या व्यक्तीच नावं असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

 

मशीनमध्ये 500 मतदान नोंदवलं होतं

अचानक येऊन सरळ ईव्हीएम मशीनवर कुऱ्हाडीने घाव घालत या व्यक्तीने ती पुर्णपणे फोडली. त्याचबरोबर या व्यक्तीने येथील मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पूर्ण मतदान केंद्रावर एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, जी मशीन फोडली त्या मशीनमध्ये 500 मतदान नोंदवलं होतं. परंतु, मशीनचे कंट्रोल यूनीट सुरक्षित असल्याने जे मतदान झालं आहे ते सुरक्षित असल्याचं मतदान अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी नवे बॅलेट आणि वोटिंग मशीन बसवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

 

मोठी बातमी : EVM-VVPAT प्रकरणात सर्व याचिका SC ने फेटाळल्या; EVM वरच होणार मतदान

या आठ मतदारसंघात झालं मतदान

आज लोकसभेच्या निवडणुकांतील दुसरा टप्पा पूर्ण झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात मतदान झालं. त्यामध्ये यवतमाळ-वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदान झालं. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही मुख्य लढत असून, काही ठिकाणी वंचितचे उमेदवार उभे आहेत.

follow us