Devendra Fadnavis : ‘माझ्या जीवनात मी कधीही अंमली पर्दाथाला स्पर्श केला नाही आणि कधीही कोणाची म्हणण्याची हिंमत झाली नाही’ असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘नशामुक्त नवी मुंबई अभियान’ (Drug-Free Navi Mumbai Campaign) कार्यक्रमात म्हणाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अभिनेता जॉन इब्राहिम (John Ibrahim) देखील उपस्थित होता.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्तवात भारत एक बलशाली झाला आहे त्यामुळे भारताकडे वाकडी नजर बघण्याची कोणाची हींमत नाही. आज आपल्या देशात दहशतवाद माजवाल तर हा देश सहन करणार नाही तर घूसून मारतो त्यामुळे देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल? आणि या देशाला आतून कसं पोखरता येईल? अशा प्रकारचा डाव सध्या सुरू आहे. असं या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देशभरातील सर्व गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती तेव्हा त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की, कॅनडा सारखा देश ड्रग्सची लढाई हारला आहे. त्यामुळे ते आता ड्रग्सला लीगल करत आहे. त्यांना माहिती आहे की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. किती लोकांना जेलमध्ये टाकणार? अशी त्यांची आवस्था झाली आहे. मात्र ,आज भारत ड्रग्शी लढाई जिंकू शकतो. त्यामुळे देशातील सर्व राज्यांनीही एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असं अमित शाह म्हणाले होते.
आज आपण ड्रग्समुक्त अभियानाची सुरुवात नवी मुंबईपासून करत आहोत. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग्समुक्त करावा लागणार आहे. असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज नव्या पिढीमध्ये ड्रग्स घेणे म्हणजे कूल आहे, अशी आजच्या नव्या पिढीची भावना आहे. मात्र ड्रग्स घेणे म्हणजे अजिबात कूल नाही. नशा करणं आणि वेगवेगळ्या सवयी लावून घेणं हे अजिबात चांगलं नाहीये. यातून दोन- चार दिवस आनंद मिळेल पण त्यामुळे जीवन बरबाद होतं. ड्रग्स घेणारे स्वतःचा आणि त्याच्या कुटूंबाचंही जीवन बरबाद करतात. हे समाजचं आणि राज्याचं जीवन बरबाद करत आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी नाही म्हणताच आलं पाहिजे.
ICC Rankings मध्ये फेरबदल, भारतीय स्टार ऋषभ पंतचा मोठा धमाका तर बुमराहने इतिहास रचला
माझ्या जीवनात मी कधीही अंमली पर्दाथाला स्पर्श केला नाही आणि कधीही कोणाची म्हणण्याची हिंमत झाली नाही,आता तर शक्य नाही. पण कॉलेजमध्ये असतानाही मला अशी सवय लावायची कोणाची हिंमत झाली नाही. याचं कारण आपला निर्धार असला पाहिजे. ही ताकद आपली असते. असेही या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.