Download App

जाहीर सभेत अजित पवारांकडून द्रौपदीचा उल्लेख, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या महाराष्ट्रात …

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Ajit Pawar : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. 19 एप्रिलला लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदार होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेते जोरदार प्रचार करत आहे. राज्यात देखील आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

यातच एका जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी द्रौपदीचा उल्लेख केला. मात्र आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक जोरदार टीका करत आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भविष्यात मुलींची संख्या जर कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल. मात्र त्यानंतर लगेच त्यांनी यातला गंमतीचा भाग सोडून द्या, नाहीतर म्हणतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. मला कुणाचाही अपमान करायचा नाही. असं स्पष्ट करत हात जोडले. मात्र आता जितेंद्र आव्हाडांनी या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसला खिंडार! उत्कर्षा रूपवते यांनी दिला पदाचा राजीनामा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

आज अजित पवार यांच्या डोक्यात जे विष होतं ते बाहेर आलं आहे. त्यांच्या काकांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ज्या महाराष्ट्रात महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय दिला त्यांच्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया द्रौपदी झाल्या असत्या असं म्हणतात. द्रौपदीचा अर्थ काय होतो? त्यांनी जरा समजवून सांगावं आणि समस्त महिला वर्गाची माफी मागावी असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज