‘घड्याळ तेरा नहीं और मेरा भी नहीं.. प्रकरण न्यायप्रविष्ट”; जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
Jitendra Awhad : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार अजित पवार गटाला (Ajit pawar Group) घड्याळ चिन्हाखाली हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करण्याचे निर्देश आले आहेत. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्हाच्याखाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार एक नोट लिहिलं अनिर्वार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) काही अटी घालून दिल्या आहेत. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला देखील महत्त्वाचे असे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले घड्याळ हे जरी निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिले असले तरी यासंदर्भातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. त्यामुळेच अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरत असताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी तसा उल्लेख करावा असे सांगितले आहे. त्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.
नाट्य परिषदेच्या नाट्यजागर स्पर्धेची उपांत्य फेरी संपन्न; मुंबईत होणार अंतिम सोहळा
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कालच आला आहे. एक महिन्यापूर्वी हे झालं असतं तर आम्ही अजित पवार गटाला मिळालेलं घड्याळ चिन्ह काढून घेतलं असतं. आता घड्याळ चिन्ह तेरा भी नहीं और मेरी भी नहीं…12 वाजले ना घड्याळाचे उद्या सील झालं तर शरद पवारांच्या 25 वर्षे मेहनतीचा काय उपयोग. मर्दाची औलाद होता तर दुसरं चिन्ह घ्यायचं होतं. आता नामुष्की आली न्यायालयाच्या निर्देशानंतर की चिन्हाबाबतच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं लिहावं लागत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केलीयं.
“फडणवीसांनी भाजपाचे मोठे नेते संपवले, भाजप म्हणजे”.. सुषमा अंधारेंची जळजळीत टीका
तसेच अजित पवारांसह गटाच्या नेत्यांवरही जितेंद्र आव्हाडांनी थेट भाष्य करीत टीका केली आहे. ते म्हणाले, भरलेल्या ताटावरुन उठायंच अन् पंतरवाळीवर बसायंच हे म्हणजे स्वतच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं केलं आहे. शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांसह गटाला आता त्याची जाणीव झाली असेल त्यांच्या जागावाटपाचं आम्हाला काही घेण देणं नाही पण इकडे होते ते बरे होते, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट निवडणूक चिन्ह म्हणून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चा वापर करू शकतो. याआधी जेव्हा निवडणूक आयोगाने पवार गटाला हे चिन्ह दिले होते तेव्हा त्याचा वापर राज्यसभा निवडणुकीपूरता वापर करण्याचे आदेश होते. आता मात्र शरद पवार गटाला हे चिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील वापरता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला दिलासा देत असताना निवडणूक आयोगाला देखील स्पष्ट आदेश दिले आहेत. पवार गटाला देण्यात आलेले तुतारी चिन्ह अन्य कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देण्यात येऊ नये असे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले आहेत.