Download App

मनधरणी सुरू! नवनीत राणांनी घेतली अभिजीत अडसूळांची भेट, राणा-अडसूळ वाद शमणार?

  • Written By: Last Updated:

Navneet Rana Meet Abhijeet Adsul : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तप बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. मतदारसंघातील दोन बडे नेते विरोधात असल्यानं राणा चांगल्याच अडचणीत आल्यात. अशातच आज त्यांनी अभिजीत अडसूळांची (Abhijeet Adsul) भेट घेतली. त्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Iran Israel Conflict : इस्त्रायलवरील हल्ला इराणला भोवणार; कठोर निर्बंधांचा अमेरिकी प्लॅन तयार 

नवनीत राणा आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कधीकाळी अडसूळ पित्रापुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. राणा यांच्या उमेदवारीलाही त्यांनी वारंवार विरोध दर्शवला आहे. आता अडसूळ यांची मनधरणी करण्यासाठी राणा दाम्पत्याने रामनवमीच्या मुहूर्तावर आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांची भेट घेतली.

Ram Lalla Surya Tilak : सूर्य देवांनी दिला प्रभू श्री रामांना आशीर्वाद; सूर्य अभिषेकाचे खास फोटो… 

त्यांनी आनंदराव अडसूळ आणि कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या निवासस्थानी जाऊन ही सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी पत्नीसह औक्षण केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना अडसूळ यांनी आपण कार्यकर्त्यांसोत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

याभेटीनंतर माध्यमांशी बोलतांना रवी राणा म्हणाले की, मोदीजींचा चारसो पार नारा पूर्ण करण्यासाठी आज रामनवमीच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहोत. आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे ध्येयधोरण आणि मोदीजींच्या विकासाच्या धोरणाला साथ देत एक दिलाने लढू. तसेच राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. त्यामुळे राजकारणातील बदलती समीकरणे आणि त्याच्या आधारे तयार होणाऱ्या युती-आघाड्या लोकहितासाठी असतात, असंही ते म्हणाले.

तर अभिजीत अडसूळ म्हणाले की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा याचं औक्षण करून स्वागत केले. सध्या आम्ही जिल्हाप्रमुख व महिला जिल्हाप्रमुखांसह अन्य कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहोत. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मताला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे कार्यकर्ते निर्णय घेऊन भूमिका ठरवतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असं अडसूळ म्हणाले.

दरम्यान, राणा दाम्पत्याने आज अभिजीत अडसूळांची भेट घेतली, त्यामुळं महायुतीतील घटक पक्षांमधील राजकीय वाद शमणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us