Download App

Loksabha Election 2024 : बारामतीचा उमेदवार जाहीर का होत नाही? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही लोकसभा मतदारसंघावरील पेच अद्यापही कायम आहे. त्यातच आज महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून (NCP AJit Pawar Group)राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar)हे परभणी लोकसभा लढवणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा पत्रकार परिषदे केली. त्याचवेळी बारामतीच्या उमेदवारीवरुन पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर खासदार तटकरे यांनी सांगितले की, बारामतीचं गणित तिथंच फिरत राहणार आहे. अर्थातच बारामतीची जागा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)लढवणार असल्याचे संकेत यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

Tech layoffs : Apple, Dell सह अनेक कंपन्यांवर टाळेबंदीची टांगती तलवार, हजारो कर्मचारी बेरोजगार

सुनील तटकरे यांनी सांगितले की, बारामतीचं गणित त्याच ठिकाणी फिरत राहणार आहे. त्याच्याबद्दल अजितदादांच्या मनामध्ये काहीही शंका नाही. ते गणित फिरत असताना तो घड्याळाचा काटा जो आहे तो, बरोबर तसाच लोलकाप्रमाणे फिरत राहणार आहे. त्याच्याबद्दलही काही नाही.

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा

त्याचबरोबर नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. त्या जागेसंदर्भातील निर्णय दोन ते तीन दिवसात होणार असल्याचेही यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.

तसं पाहिलं तर महायुतीसोबतच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रायगडची जागा ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लढवणार आहेत. दुसरी जागा शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आयात करुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देण्यात आली आहे. तर आज राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून परभणीत रासपचे नेते महादेव जानकर यांना देण्यात आली आहे. त्याचबरोबर आणखी नाशिक, बारामती आणि सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आग्रही आहे.

विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असं असलं तरी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बारामती मतदारसंघात अजितदादांकडून नाराज असणाऱ्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत, सर्व गोष्टी सुरु असल्या तरीही आत्तापर्यंत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही.

follow us

वेब स्टोरीज