Download App

Rahul Narvekar : ‘न्यायालयाने जे सांगितलं त्यानुसारच आज’.. निकालाआधी नार्वेकरांचे मोठे विधान

Rahul Narvekar on MLA Disqualification Case :  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज दुपारी निकाल देणार आहेत. या प्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. आज या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निकाल द्यावाच लागणार आहे. या निकालाकडे देशाचे लक्ष लागलेले असतानाच स्वतः राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या काही तास आधी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून त्यानुसार आज निकाल देणार आहोत असे नार्वेकर म्हणाले.

नार्वेकर पुढे म्हणाले, हा निकाल कायद्याला धरून असेल. संविधानाच्या तरतुदींचे पालन करून सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्यावरच आजचा निकाल आधारित असेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही नार्वेकर म्हणाले. संविधानाच्या दहाव्या परिशिष्टाचे आकलन आजपर्यंत योग्य पद्धतीने झाले नव्हते. आता या प्रकरणाच्या माध्यमातून आम्ही योग्य निकाल देणार असल्याचे नार्वेकर म्हणाले.

MLA Disqualification : वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक, राजकीय चर्चांना उधान

यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिले. आमदार अपात्रतेचा निकाल दिल्लीतच झाला आहे. त्यामुळे आजच्या निकालाची फक्त औपचारिकता राहिली आहे असे राऊत म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, की राऊत काहीही टीका करू शकतात. ते उद्या म्हणतील की हा निकाल लंडन, अमेरिकेवरून आणला आहे. त्यांच्या टीकेला काहीच अर्थ नसतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देऊन आम्हाला त्यांना स्वस्तातली प्रसिद्धी द्यायची नाही, असा खोचक टोला त्यांनी राऊतांना लगावला.

दरम्यान, शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आज दुपारी चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाहीर करणार आहेत. यासंदर्भात मुंबई आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे ज्येष्ठ नेते काल वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते.

Disqualification MLA : लवाद अन् आरोपींची दोनवेळा भेट; उद्धव ठाकरेंनी भेटीचा पुरावाच दाखवला

निकालाआधी काल मोठी बैठक 

महायुतीच्या सरकारसमोर मराठा आरक्षण आणि आजचा निकाल हे दोन मोठे प्रश्न आहेत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय असणार आहे याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. आजच्या निकालाने महाराष्ट्राचे राजकारण बदलू शकेल का? याची देखील उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. या निकालाचे पडसाद राज्यात उमटले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्ना निर्माण झाला तर त्यावरील उपाययोजनांसाठी ही बैठक आयोजित केली होती.

 

follow us

वेब स्टोरीज