Download App

फडणवीस खरंच राजीनामा देणार? दिल्लीला रवाना, मोदी-शहांची घेणार भेट

लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ उठलं. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीने पत्रकार परिषद घेत पराभवाची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे सांगितले. यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीस राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवतील असे सांगितले जात आहे. आता या भेटीत नेमकं काय घडणार याची उत्सुकता आहे.

Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा झटका बसला. त्यातही भाजपाची मोठी पिछेहाट झाली. मागील निवडणुकीत एकट्या भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. यावेळी ही संख्या नऊपर्यंत कमी झाली. हा मोठा नामुष्कीजनक पराभव भाजपला सहन करावा लागला. शेतकऱ्यांचा रोष, मनमानी कारभार, दुसऱ्या पक्षांत फोडोफोडी या गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत अशी चर्चा आता सुरू आहे. भाजपकडूनही निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. काल या पराभवावर चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळातील वाटचाल ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील पराभवाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी एकट्यावर घेतली आणि मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली.  यानंतर त्यांच्या सागर बंगल्यावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यांनी फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आजही नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असून सागर बंगल्यावर वर्दळ वाढली आहे.

या घडामोडींंनंतर फडणवीस आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात ते राजीनामा देतील का हा प्रश्न आहे. आता फडणवीस राजीनामा देऊन पक्षात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारतील अशी चर्चा सुरू झाली आहे. आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाईल अशीही चर्चा आहे. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडामोडी घडतात. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Kangana Ranaut: ‘पंगाक्वीन’ अभिनेत्री कंगना निवडणुकीच्या रणात चमकणार! मंडी लोकसभा मतदार संघात आघाडीवर

follow us