Devendra Fadnavis : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं असतील अशी शक्यता आहे. या यादीत गडकरी यांचं नाव असेल असा मोठा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. फडणवीस आज नागपुरात होते. यावेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या उमेदवारीबाबत भाष्य केले तसेच गडकरींना ऑफर देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर फडणवीसांनी जोरदार पलटवार केला. ‘ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो माझ्याकडं या असं सांगण्यासारखं आहे. खरं म्हणजे गडकरी साहेब आमचे मोठे नेते आहेत. ज्यावेळी पहिली यादी आली त्यावेळी महाराष्ट्रात महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्राच्या जागांवर आम्ही चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर ज्यावेळी चर्चा होईल त्यात सगळ्यात आधी नितीनजींचं नाव येईल. त्यामुळे स्वतःला मोठं दाखवण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत यात त्यांचं हसं होत आहे’, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.
मावळ गोळीबारावेळी कुणाचं सरकार?
राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता अब की बार गोळीबार सरकार अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. ‘मी सुप्रियाताईंना इतकच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं. सुप्रियाताई सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत त्यामुळे त्या रोज अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. फार गांभर्याने घेण्याची गरज नाही’, अशा शब्दांत फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
लोकसभा रणशिंग! मविआचे जिल्ह्यातील दक्षिण-उत्तर झाले फायनल?