Download App

एकटे पायी मुंबईला निघालेल्या जरांगेंना भोवळ; अंतरवलीत तणाव…

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. आरोपांनंतर मनोज जरांगे (Manoj Jarnage Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच येऊन उपोषण करण्याची घोषणा केली. मनोज जरांगे सध्या एकटेच पायी सागर बंगल्याच्या दिशेने रवाना होत असून यावेळी त्यांना भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे मागील 15 दिवसांपासून उपोषण करीत आहेत. अशातच आज आक्रमक भूमिका घेत ते सागर बंगल्याकडे एकटेच पायी निघाल्याने त्यांना भोवळ आली आहे. या प्रकारामुळे अंतरवली सराटीतील मराठा समाजबांधवांमधून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात असून तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

“मी कामाचा माणूस, खासदार निवडून द्या, पुढे जबाबदारी माझी”; इंदापुरात अजितदादांची जोरदार बॅटिंग

मला संपवण्याचं कारस्थान देवेंद्र फडणवीस यांनीच रचलं आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळी लोकं पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. मी आता थेट सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

जरांगे पाटील पुढे म्हणाले, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याच्या विचारात आहेत. आज मराठा समाजाचा दरारा निर्माण झाला आहे. परंतु, मराठ्यांच्या हातूनच संपवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे दोन-चार आणि अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत.

मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला आता संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दहा टक्के आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे यासाठी प्रयत्न केला जात आहे. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us