महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : राज्य सरकारच्या महिला कल्याण विभागाने (Department of Women Welfare)महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना (Maharashtra Widow Pension Scheme)सुरु केली आहे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सहज अर्ज करता येतो. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 ते 900 रुपये पेन्शन मिळते. एखाद्या महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला कोणाचाही आधार मिळत नाही. त्यामुळे त्यांची स्थिती आणखीनच वाईट बनते. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांच्यासाठी महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे.
नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून होणार लागू, गृहमंत्रालयाने काढली अधिसूचना; काय आहेत हे कायदे?
योजनेचे फायदे काय?
– महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेंतर्गत विधवा महिलांना सरकारकडून दरमहा 600 रुपये दिले जातात.
– एखाद्या महिलेला मुले असतील तर तिला दरमहा 900 रुपये दिले जातात.
– पेन्शन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा जास्त नसावे.
– योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन रक्कम दर महिन्याला महिलेच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
– महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतून मिळणार्या पेन्शनने त्या स्वतःचे जीवन जगू शकतील, त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता काय?
– लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी.
– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 21000 रुपयांपेक्षा कमी असावे.
– दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
– महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह केलेला नसावा.
– ही पेन्शन मिळवण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे आहे.
– अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे अनिवार्य आहे.
कधीही छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
आवश्यक कागदपत्रे काय?
– आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र.
– पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
– वयाचा पुरावा
– बँक पासबुक
– रहिवासी दाखला
– उत्पन्नाचा दाखला
– अनुसूचित जाती, मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
– पासपोर्ट आकाराचा फोटो
– नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)