Government Schemes : गर्भवती अन् बालकांसाठीची ‘वात्सल्य’ योजना नेमकी आहे तरी काय?
Government Schemes : भारत सरकारने (Government of India)गर्भवती (pregnant women)आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ (Vatsalya)या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत गर्भवती, प्रसूतीपश्चात माता आणि दोन वर्षापर्यंतच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे.
Madhuri Dixit: गुलाबी साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज, चाहते फिदा
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांना मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना गर्भवतींची समस्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर गर्भवती आणि बालकांसाठी वात्सल्य ही नवीन योजना राज्यभरात लागू केली जात आहे.
Madhuri Dixit: गुलाबी साडीत ‘धकधक गर्ल’चा मनमोहक अंदाज, चाहते फिदा
आता माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बाल संगोपनाच्या विविध योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जात आहेत.
नव्याने सुरुवात केलेल्या वात्सल्य या उपक्रमांतर्गत गर्भवतीपासून ते शिशू 2 वर्षाचे होईपर्यंत आवश्यक सर्व गुणात्मक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तसेच शिशू दोन वर्षांचे होईपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशांकावर सात्यत्यपूर्ण लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे कमी वजनाच्या बालकाच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मजात व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. वात्सल्य उपक्रमात जननक्षम जोडपे आणि गर्भवती यांच्या आवश्यक चाचण्या करुन अतिजोखमीच्या मातांचे निदान होऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार केले जाणार आहे. तसेच बालकांच्या एक हजार दिवसापर्यंत वाढीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक सेवा दिल्या जाणार आहेत.
वात्सल्य योजनेचे लाभ:
– गर्भवतींची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार.
– कुटुंबनियोजन साधन न वापरणाऱ्या जोडप्यांची तपासणी केली जाणार.
– जोडप्यांवर उपचार आणि त्यांचे समुपदेशन केले जाणार.
– प्रसूतिपूर्व, प्रसूतिपश्चात धोक्यांची तपासणी केली जाणार.
– माता, बालकाला आरोग्यासाठी असलेली जोखीम तपासणे.
– गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी अनुदान दिले जाणार.
– प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च दिला जाणार.
– प्रसूतीनंतरच्या काळात आरोग्य सेवा दिल्या जाणार.
– बालकांचे बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार.
– बालकांचे लसीकरण केले जाणार.
– बालकांच्या पोषण आहारासाठी अनुदान दिले जाणार.
(टीप : योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)