Download App

‘फडणवीसांना एक चूक महागात पडणार’; मनोज जरांगेंनी कडक शब्दांत सुनावलं

Image Credit: Letsupp

Manoj Jarange On Devendra Fadnvis: एसआयटी चौकशीसंदर्भात अहवाल आधीच तयार आहे, चौकशी फक्त नाटक असून मला अटक करण्याची चूक करुनच दाखवा तुम्हाला महागात पडणार असल्याचं म्हणत मराठा आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) कडक शब्दांत सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. ते लातूरमध्ये आले असता माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

“मला दोन पक्षांच्या ऑफर, राज ठाकरेंचाही फोन आला होता”, पण… वसंत मोरेंनी सगळंच सांगितलं

मनोज जरांगे म्हणाले, एसआटीसंदर्भात अहवाल तयार झालेला आहे, एसआयटी हे फक्त नाटक असून तुम्ही मला अटक करुन दाखवाच भावनिक लाट काय असते हे तुम्हाला समजेल, फडणवीससाहेब ही तुमची सर्वात मोठी चूक असणार आहे अशी भावनिक लाट येणार की तुमच्या आयुष्यात असा सुफडा साफ पाहिला नसेल ही तुमची आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरणार असल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार गटात प्रवेशाच्या अफवा पण लंकेंच्या चेहऱ्यावर भलतंच टेन्शन!

तसेच आम्ही मुंबईला पदयात्रा घेऊन जात होतो, तेव्हापासूनच फडणवीसांनी ट्रॅप रचला होता. लोकं नेणं, लोकं फोडणं, खोटनाटं बोलून घेणं, लोकं घुसवणं, बदनाम करणं हे देवेंद्र फडणवीसांनी केलं असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी यावेळी केला आहे. तसेच मराठा आरक्षणसंदर्भात न्यायालयाने 13 तारीख दिली एकाच दिवसांत ती 23 कशी काय झाली? असा सवालही मनोज जरांगे यांनी सरकारकडे केला आहे.

मोठी बातमी : ‘फायरब्रॅंड’ नेते वसंत मोरेंचा राजीनामा; साहेब माफ करा म्हणत मनसेला ‘जय महाराष्ट्र’

मराठा आरक्षणासंदर्भात खाजगी माणसाने याचिका केली. त्यामुळे सरकारचे वकील कसे काय उभे राहिलेत? सरकारला हा कोणता अधिकार आहे. न्यायालयाने तुम्हीच अर्ज केला की, उपोषण थांबवा उपचाराला पाठवा पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, आंदोलन थांबवू शकत नाही तो त्यांचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या सरकारने चालवलेली फसवणूक सहन होत नाही. तुम्ही गुन्हे दाखल करणार, एसआयटी दाखल करणार, होऊनच जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. अंतरवली सराटीत लाठीजार्चमध्ये ज्या माता, माऊली जखमी झाल्या आहेत. त्यांना ज्यांनी जखमी केलं त्यांच्यावर 120 ब आणि 307 नूसार गुन्हा दाखल होणार का? असा उपरोधिक सवालही मनोज जरांगे यांनी केला आहे.

follow us

वेब स्टोरीज