Nitin Deshmukh : ‘माझा गेम करण्याचा कट देवेंद्र फडणवीसांनी रचला होता’असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांसोबत नितीश देशमुख सुरतला गेले होते. मात्र, सुरतहून ते पुन्हा माघारी आल्याचं समोर आलं होतं. त्याचवेळी माझा गेम करण्याचा कट फडणवीस यांनी रचला असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकिल संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा
पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, माझा गेम करण्याचा कट फडणवीसांनी रचला होता, याबाबतची माहिती मला शिंदे गटातील आमदारांनीच दिली. कारण सत्तास्थापनेत माझा अडथळा होणार होता, त्यामुळे माझा गेम करण्याचा प्लॅन होता हा प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी रचला होता, असा आरोप नितीन देशमुखांनी केला आहे.
राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीस राजीनामा द्या; घोसाळकर गोळीबारानंतर राऊतांचे टीकास्त्र
तसेच हे सरकार सत्तेसाठी काहीही करायला तयार आहे. मला शिंदे गटाच्या एका आमदाराने सांगितलं की तुम्ही ज्यावेळी सुरतला होते, मी जाण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी फडणवीसांनी तुमचा गेम करण्याचं षडयंत्र रचल होतं, त्यांनी त्यावेळी मला ह्रदयविकाराचा झटका आल्याची खोटी बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली असल्याचंही नितीन देशमुखांनी सांगितलं आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेनेतील हे आजपर्यंतच सर्वात मोठं बंड होतं. गेल्या वर्षी 20 जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. त्या रात्री ते सुरतला गेले. सुरतवरुन गुवाहाटी येथे गेले होते. आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे.