“मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, तिथं माझ्या घातपाताचा कट होता”, ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

“मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं, तिथं माझ्या घातपाताचा कट होता”, ठाकरेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट

MLA Nitin Deshumkh on Shivsena Dispute : शिवसेनेतील बंडाला दोन वर्षांचा कालावाधी उलटून गेला. या राजकीय नाट्यात काय काय घडामोडी घडल्या याची चर्चा होत असते. परंतु, आता निवडणुका जवळ आल्याने या चर्चांनी पुन्हा वेग घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं.” “सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट काही लोकांनी रचला होता”, असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार देशमुख यांनी केला. देशमुख शुक्रवारी बाळापूर येथे नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंनी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्यावा; अमित शाहांवरील टीकेला फडणवीसांचे चोख प्रत्त्युतर

देशमुख पुढे म्हणाले, राज्यातील सत्ताधाऱ्यांनी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. माझ्या दहावीत शिकणाऱ्या मुलाची चौकशी सुरू आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलीची अँटी करप्शन विभाग चौकशी करत आहे. इतकं होत असतानाही तुमचा आमदार कधीच डगमगला नाही. ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी मी सुरतला गेलो होतो. कोणत्या परिस्थितीत त्या लोकांनी मला तिथं नेलं, माझा घात केला हे सगळं तुम्ही पाहिलं आहे, असे नितीन देशमुख उपस्थितांना म्हणाले.

ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी मला सुरतला कसं नेलं गेलं हे मी याआधीच सांगितलेलं आहे. त्या लोकांनी मला इंजेक्शन दिलं आणि घेऊन गेले. नंतर प्रसारमाध्यमांत बातम्या दिल्या की मला हृदयविकाराचा झटका आसला आहे. पण मला असा कोणताच झटका आला नव्हता. फक्त लोकांत संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांना तशी बातमी पसरवायची होती. त्यांना तशी बातमी पसरवायची होती कारण त्यांना तुमच्या या आमदाराचा घातपात करायचा होता असा धक्कादायक खुलासा नितीन देशमुख यांनी केला.

बैठकीला दांडी! नितीन देशमुखांनी तहसीलदार अन् कृषी अधिकाऱ्यांना कोंडूनच घेतलं

देशमुख पुढे म्हणाले, नितीन देशमुख येथून जाऊ नये असा फोन दिल्लीतून आला होता. त्याला हवं तर मारून टाका, त्याचा गेम करा असा फोन दिल्लीतून आला होता. याचवेळी मला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या टिव्हीवर येत होत्या. पण मला कोणताही झटका आलेला नव्हता. त्या लोकांना फक्त असा फोन आला होता की नितीन देशमुख जर ऐकत नसेल तर त्याचा गेम करा. हे सगळं भारतीय जनता पार्टीचा एक आमदार सांगत होता अस आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला. आता त्यांच्या या धक्कादायक आरोपांवर शिंदे गट आणि भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube