Download App

Uddhav Thackeray : कृषिमंत्र्यांनी कुठल्या तरी एका घरात बसून कामं करावीत, उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंना डिवचलं…

Uddhav Thackeray On Dhananjay Munde : पिकविमा(crop insurance), शेतकरी कर्जमुक्ती (Farmer loan waiver)यासह विविध विषयांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आपल्या कुठल्या तरी एका घरात बसून शेतकऱ्यांची कामं करावीत असा टोला लगावला आहे. त्यावर आता कृषीमंत्री धनंजय मुंडे काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.

महिलांनी किमान ८ मुलं जन्माला घाला; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं महिलांना अजब आवाहन

अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले आहेत. शेतकऱ्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपासून हे शेतकरी मुंबईमध्ये गेले आहेत. आज शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत पत्रकार परिषद घेतली.

अजिदादांनी जरांगे पाटलांचे कान टोचले; भुजबळांचीही अप्रत्यक्ष भूमिका मांडली…

त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील शेतकरी अडचणीत असताना राज्यकर्ते मात्र दुसऱ्या राज्यातील प्रचारासाठी जात आहेत, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. एक तर सरळसरळ नुकसानभरपाई द्या नाहीतर सरसकट कर्जमुक्ती द्या, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या माध्यमातून 8 हजार कोटी रुपयांचा घोटाळा (8000 crore scam)केल्याचा आरोप केला आहे. राज्य सरकारने आपले अवयव विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

हे शेतकरी मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर पीक विमा योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

यावेळी हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्या आहेत. शेतकरी म्हणाले की, आमचे जास्तीत जास्त तीन लाखांचं शेतकऱ्यांचं कर्ज आहे. सरकारने हे अवयव विकत घ्यावेत आणि आमची कर्जफेड करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आम्हाला फक्त सहानुभूती नको, सरकारने आम्हाला दडपवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला गाडीत बसवलं. पण कुठे चाललो हे काही सांगितलं नाही, असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

follow us