महिलांनो, किमान ८ मुलं जन्माला घाला; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं महिलांना अजब आवाहन
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालावी, असं विधान केलं.
Bigg Boss 17: आधी भांडण अन् आता प्रेम…; अंकिता लोखंडे विकी जैन ठरले ‘परफेक्ट पार्टनर’
आज देशात लहान कुटुंबांमुळे लोकसंख्येचे संकट वाढत आहे. आगामी दशके आणि भावी पिढ्यांसाठी रशियाची लोकसंख्या टिकवून ठेवणे आणि वाढवणे हे आमचे ध्येय असल्याचे पुतीन म्हणाले.
मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करताना पुतिन म्हणाले की, रशियाची लोकसंख्या वाढवणं हे सरकार समोरचं मोठ आव्हानं आहे. देशाची लोकसंख्या वाढली तर रशिया जगात सशक्त राष्ट्र बनेल. भविष्यात देशाची लोकसंख्या अपेक्षेप्रमाणे वाढली तरच रशियाचे भविष्य सुरक्षित होईल. तसचं रशिया पूर्वीसारखा बलशाली आणि श्वाश्वत रशिया होईल, असं पुतीन म्हणाले.
Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
ते म्हणाले, रशियातील काही जाती समूह अजूनही चार, पाच किंवा त्याहून अधिक मुले जन्माला घालण्याची परंपरा कायम ठेवली. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पूर्वी, रशियन कुटुंबांमध्ये, आमच्या आजी आणि आजोबांना सात, आठ किंवा त्याहून अधिक मुले होती. या महान परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करणं आज गरजेचं आहे. मोठी कुटुंबे ही आदर्श जीवनशैली व्हायला हवी. कारण कुटुंब हा केवळ राज्य आणि समाजाचा पाया नाही तर एक आध्यात्मिक घटना आणि नैतिकतेचा स्रोत देखील आहे. रशियातील अनेक दशकांपासून घटत असलेल्या जन्मदराच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांची टिप्पणी फार महत्वाची मानली जाते.
रशियाची लोकसंख्या कमी होतेय
इंडिपेंडंटच्या अहवालानुसार 1 जानेवारी 2023 रोजी रशियाची लोकसंख्या 146,447,424 आहे. जी1999 च्या तुलनेत कमी आहे. रशियाची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे कामगारांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियालाही कामगारांची कमतरता आणि वाढत्या आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे देशाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला आहे. युक्रेनमधील युद्धामुळे 900,000 लोकांनी देश सोडल्याचा अंदाज आहे. शिवाय, ऑक्टोबरमध्ये, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने नोंदवले की युक्रेनविरुद्धच्या युद्धात सुमारे 300,000 रशियन सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. ज्यामुळे रशियामध्ये लोकसंख्येचे संकट वाढले आहे.