Uddhav Thackeray असे का म्हणाले; ‘कोंबड आधी की अंडे..?
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर (Shinde group) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विधिमंडळ, संसद आणि रस्त्यावरचा असे पक्षाचे तीन प्रकार सांगितले. तसेच, दुसरी शिवसेना मी मानत नाही, एकच शिवसेना (Shivsena) आहे, असं मी मानतो असंही ते म्हणाले. “गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणाचा, नीचपणाचा आहे,” असे ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटालाच घटनाच नाही, शिंदे गटाचं ‘मुख्यनेता’ हे पद शिवसेनेत नाही, असे ठाकरे यांनी नमूद केले.
कोंबड आधी की अंडे आधी असा हा विषय सुरू झाला आहे. गद्दार गटाचा आम्ही शिवसेना दावा सांगावा हे अत्यंत नीच आणि विकृत कृत्य आहे. अपात्रतेचा फैसला आधी व्हायला हवा. हे घडलं जून महिन्यात. जुलैमध्ये हा गद्दार गट आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवर दावा सांगितला. काही घटनातज्ज्ञांच्या मते अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा. जर ते अपात्र होणार असतील तर मग त्यांचा हा दावा निवडणूक आयोग कसा गृहीत धरू शकतं ? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आयोगाचा निकाल लागू नये, असं आमचं मत आहे, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडली.
शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंनाच शोभून दिसतो. म्हणून तो शब्द आम्ही गोठवला किंवा तसाच ठेवला. त्यानंतर मी शिनसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केलं आणि गेली काही वर्षं मी कारभार बघतोय. शिवसेना प्रमुख हा शब्द फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभून दिसत. म्हणून ते अबाधित ठेवलं आहे. पक्ष हा तळागळातील कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आमच्याबरोबर असे कार्यकर्ते सोबत आहेत. त्याचे पुरावे आम्ही निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. त्यामुळे आम्हाला निवडणूक घ्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यांनी अद्याप मंजुरी दिली नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.