NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचा युकिवाद कामत यांनी केला होता. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनावणीदरम्यान काय घडलं? याबाबत भाष्य केलं आहे.
चार राज्यात PM मोदींचा झंझावती प्रचार दौरा, मिझोराममध्ये एकही सभा का घेतली नाही?
अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, अजित पवार गटाने औपचारिकपणे मुलाखत दिली आहे. राष्ट्रवादीच्या सुनावणीला आणखी किती दिवस लागणार? दोन्ही गटाकडून युक्तिवाद करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार आहेत? किती दिवसांत निर्णय लागणार? असं अजित पवार गटाकडून आयोगाला विचारणा करण्यात आली. त्यावर सुनावणी दरम्यान निर्णयाला घाई करण्यात येणार नसल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून घेण्यात येत असलेल्या पत्रकार परिषदेवरही अजित पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आल्याचंही सिंघवी यांनी सांगितलं आहे.
Manoj Jarange : ‘राजीनामा द्यायला सुद्धा मोठं मन लागतं’; जरागेंनी भुजबळांना डिवचलं
शरद पवार गटाकडून कामत यांचा युक्तिवाद :
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर म्हणाले की, पक्षांतर्गत जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला आयोगात आव्हान देता येणार नाही. पक्षांतर्गत झालेली निवडणूक योग्य की अयोग्य हे आव्हानात्मक ठरु शकत नाही ही मागणी आहे.
जेवढ्या निवडणूका झाल्या आहेत, त्या निवडणुकांमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी सहभाग घेतलेला आहे. निवडणुकीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी कोणताही विरोध आक्षेप घेतलेला नाही. 20 वर्षांपासून निवडणूकीत सहभाग घेऊन ही निवडणूक चुकीची आहे असा आरोप करणं हे बेकायदेशीर आहे.
संविधानानूसार पक्षाच्या घटनेतील बाबींनूसार पक्षांतर्गत निवडणूका झाल्या आहेत. कायदेशीर तपासणी झाली पाहिजे, आमदारांची संख्या आमची जास्त फक्त आमदारांचीच संख्या नाहीतर संघटनात्मक टेस्टही आवश्यक आहे.
दरम्यान, पुढील सुनावणी 4 तारखेला होणार असून पुढील सुनावणीवेळी वकील कामत शरद पवार गटाकडून युक्तिवादाचा समारोप करणार आहेत. दुसऱ्या गटाची बाजू आयोगाकडून ऐकण्यात येणार असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत, याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली आहे.