Download App

Lok Sabha : राष्ट्रवादीची तीन लोकसभा मतदारसंघातील तयारी पूर्ण; उमेदवारांची नावही फायनल!

Jayanyt Patil On Pratik Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha 2024 ) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP ) बैठका सुरू आहेत. त्यामध्ये आज पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवारांनी जाहीरपणे आपल्या उमेदवारीविषयी भाष्य केले आहे. शिरुर लोकसभेमधून सध्या राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे खासदार आहेत. पण राष्ट्रवादीचेच विलास लांडे यांनी या जागेवरुन लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ( NCP Final Three names For Lok Sabha 2024 in Pune Meeting )

तिकीटासाठी भांडलात तर कानाखाली जाळ काढील; अजितदादांचा वरिष्ठ नेत्यांना दम

यावेळी जयंत पाटलांनी सांगलीतील उमेदवारीबद्दल बोलताना आपले पुत्र प्रतिक पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संधी मिळू शकते. असे संकेत दिले आहेत. सांगली लोकसभेच्या जागेसाठी प्रतिक पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर प्रश्न विचारला असता. जयंत पाटील म्हणाले की, अजून लोकसभेला एक वर्षाचा कालावधी आहे. चर्चा तर होत असतात. सांगली लोकसभेच्या जागेसाठी योग्य ती चर्चा करू. कॉंग्रेसशी बोलू. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलू. असं म्हणत जयंत पाटलांनी सांगली लोकसभेच्या जागेसाठी प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीचे संकेतच दिले आहेत.

भुजबळांनी सांगितला अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा फॉर्म्युला; म्हणाले प्रत्येक…

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच सांगलीतील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रतिक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी विजयराव पाटील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे प्रतिक पाटील अगोदरच राजकीय कारकीर्दीसाठी मैदानात उतरलेले असताना आता त्यांच्या नावाची चर्चा थेट आगामी लोकसभा निवडणुकीसाठी होत आहे.

Ajit Pawar युतीमध्ये येणार? दादांनी एका वाक्यात विषय संपवला…

दरम्यान दुसरीकडे याच बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी बोलताना पक्षातील नेत्यांना सज्जड दम दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली नाही म्हणून भांडयाचं नाही, नाही तर एकेकाच्या कानाखाली आवाज काढील बाकी काही नाही करायचो. याच्यातून तुमची नाही तर आमची बदनामी होते, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरला आहे. यामुळे पवारसाहेबांची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा चालला आहे, असे ते म्हणाले.

Tags

follow us