Download App

महाविकास आघाडीचे जागा वाटप कधी होणार ? जयंत पाटलांनी सांगितली ‘डेडलाइन’

  • Written By: Last Updated:

Jayant Patil On loksabha seat sharing : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) )आता अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे भाजप व काँग्रेसकडून उमेदवारांची एक-एक यादी जाहीर झाली आहे. परंतु दोन्ही पक्षाने महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ सुरू आहे. जागा वाटपाचा पेच आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. घटक पक्षांना किती जागा द्यायच्या यावर एकमत होताना दिसत नाही. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जागा वाटपाबाबत स्पष्टपणे सांगितले आहे.

Lok Sabha elections : कॉंग्रेसमधील सुपारीबाजांची नावं जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

जयंत पाटील म्हणाले, बीड व सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी बोलविण्यात आले होते. त्यांची मते पक्षाने जाणून घेतली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ते सहा ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्या जागा व उमेदवार जयंत पाटील यांनी सांगितल्या नाहीत. त्यातील बारामती, शिरुर, सातारा या तीन जागा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे हे उमेदवार असणार आहेत.


Loksabha Election: मंत्री विखेंना लोकसभेचे तिकीट : सुजय यांचा पत्ता कट होणार?

महाविकास आघाडीचे जागा वाटप रखडल्याबाबत जयंत पाटील म्हणाले, घटक पक्षांना जागा वाटप कसे करायचे याची चर्चा सुरू आहे. घटक पक्षांना जागा वाटपाचा आकडा निश्चित झालेला नाही. जागा वाटप होण्यासाठी आणखी पाच ते सहा दिवस लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढविणार आहे याचा उत्तर देणे जयंत पाटील यांनी मात्र टाळले.


प्रकाश आंबेडकर नक्की आघाडीत येणार, जयंत पाटलांना विश्वास

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप रखडले आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहजुन आघाडीला महाविकास आघाडीकडून दोन-तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. तर प्रकाश आंबेडकर हे जास्त जागा मागत आहे. त्यावरून त्यांनी काँग्रेसला टीका केली आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला आमच्याबरोबर घ्यावेच लागणार आहे. भाजपला हरविण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर येतील, याची खात्रीच आहे.

follow us