Download App

मागील 17 वर्षांत 121 लोकांची ED चौकशी; आकडेवारी सांगत शरद पवारांचा भाजपवर घणाघात

Sharad Pawar On BJP : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून विविध जिल्ह्यांत दौरे सुरु आहेत. जाहीर सभांच्या माध्यमातून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. यावेळी बोलताना शरद पवारांनी ईडीच्या केसेसची आकडेवारी सांगत घणाघात केला आहे. नाशिकमध्ये ते बोलत होते.

मोठी बातमी : अजितदादांविरोधात शिवतारेंनी शड्डू ठोकला! बारामतीत अपक्ष म्हणून मैदानात उतरणार

भाजपकडून विरोधकांवर ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्सची कारवाई होत असल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता शरद पवारांवर यावर थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मागील 17 वर्षांत ईडीच्या एकूण 5 हजार 906 केसेस दाखल झालेल्या आहेत. यामध्ये फक्त पॉईंट 25 टक्केच केसेस निकाली काढलेल्या आहेत. यामध्येही शिक्षा होण्याचं प्रमाण पॉईंट 40 टक्केच आहे. विरोधकांवर केवळ केसेस दाखल करायच्या जेलमध्ये टाकायचं. संजय राऊत, अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं पण आरोपात दम नसल्याचं समोर आलं असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

विद्या बालनच्या ‘दो और दो प्यार’ची रिलीज डेट; ‘या’ दिवशी करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

आधी कारवाई नंतर निकाल विरोधातच…
सत्ताधारी पक्षाला सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे ते विरोधकांवर हल्ला करण्याचे त्यांचे पाऊले दिसत आहेत. ईडी, सीबीआय विरोधकांच्या मागे लावतात. मात्र विरोधक जेव्हा कोर्टात जातात तेव्हा निकाल सरकारच्या विरोधात लागतो, असे शरद पवार म्हणाले आहेत.

२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने १२१ लोकांची चौकशी मोदी सरकारने केली. त्यातील ११५ जण विरोधी पक्षामधील होते. याचा अर्थ ईडी फक्त विरोधी पक्षांसाठी वापरली गेली. यामध्ये काँग्रेस २६, टीएमसी १९, राष्ट्रवादी ११, शिवसेना ८, डिएमके ६, बीजू जनता दल ६, आरजेडी ५, समाजवादी पक्ष ५, यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध राज्यातील १४ मंत्री, २६ खासदार, २१ आमदार, ५ माजी आमदार, अशी मोठी आकडेवारी आहे. यामध्ये एकही भाजप नेत्याचा समावेश नसल्याचं पवार म्हणाले आहेत.

follow us