विद्या बालनच्या ‘दो और दो प्यार’ची रिलीज डेट; ‘या’ दिवशी करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

विद्या बालनच्या ‘दो और दो प्यार’ची रिलीज डेट; ‘या’ दिवशी करणार बॉक्स ऑफिसवर कल्ला

Do Aur Do Pyaar Release Date: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ती ‘दो और दो प्यार’मध्ये (Do Aur Do Pyaar Movie) दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत इलियाना डिक्रूझ (Ileana D’Cruz) आणि प्रतीक गांधी (Prateek Gandhi) यांच्यासह एक अमेरिकन अभिनेता आहे.

शिर्षा गुहा ठाकुरता दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा चित्रपट 19 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे, पण त्याची टक्कर जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाशी होणार आहे.

विद्या बालनच्या ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात इलियाना डिक्रूझ देखील आहे. नुकतेच या रोमँटिक ड्रामाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले. सोबतच निर्मात्यांनी रिलीज डेटही जाहीर केली. यापूर्वी 29 मार्चला प्रदर्शित होणारा ‘दो और दो प्यार’ आता पुढे ढकलण्यात आला आहे. हा चित्रपट आता 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टर शेअर करताना विद्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रेम कदाचित अप्रत्याशित असेल, पण ते पूर्णपणे मादक असणार आहे.

आशा भोसले यांनी जाहीर केली नात जनाईचे बॉलिवूड पदार्पण, दिसणार या चित्रपटात

अमेरिकन अभिनेता दिसणार: विद्या आणि इलियाना व्यतिरिक्त या चित्रपटात प्रतिक गांधी आणि अमेरिकन अभिनेता सेंधील राममूर्ती देखील आहेत. यामध्ये प्रेम आणि आधुनिक नातेसंबंधांच्या कथेसोबतच चाहत्यांना हसायला मिळणार आहे. सोबतच या सिनेमाशिवाय विद्या ‘भूल भुलैया 3’मध्येही दिसणार आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आहे.

जान्हवी कपूरच्या चित्रपटासोबत कांटे की टक्कर: जान्हवी कपूरने 9 नोव्हेंबर 2023 रोजी घोषणा केली होती, तिचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’ हा चित्रपट 19 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जान्हवी कपूरच्या चित्रपटासोबत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. करण जोहरच्या या सिनेमात राजकुमार रावही आहे. याआधी दोघांनी ‘रुही’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. दिग्दर्शन शरण शर्माचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज