नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीत… अजितदादांच ठरलं भाजपच ऐकायचं नाही

NCP : नवाब मलिकांमुळे मुस्लिम मते राष्ट्रवादीकडे आकर्षित होतील, असं गणित अजितदादांचे आहे. परंतु भाजपचा विरोध आहे.

NCP star campaigner Mahanagarpalika Election Nawab Malik

NCP star campaigner Mahanagarpalika Election Nawab Malik

NCP star campaigner: महानगरपालिका (Mahanagarpalika Election) निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) चाळीस जणांची यादी जाहीर केलीय. या यादीत भाजपकडून विरोध होत असलेले माजी मंत्री व नवाब मलिक (Nawab Malik) यांचाही समावेश करण्यात आला आहे. या यादीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ( NCP star campaigner Mahanagarpalika Election Nawab Malik)

यादीत छगन भुजबळांचा समावेश नाही. नगरपालिका निवडणुकीतही त्यांचा समावेश नव्हता. छगन भुजबळांचे वैद्यकीय कारणामुळे जनसामान्यात मिसळत नाही. त्यामुळे त्यांचे नाव यादीत नाही. त्यांच्याएेवजी पुतणे समीर भुजबळ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर मुलगी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, त्यांचे बंधू अनिकेत तटकरे असे एकाच घरातील तिघे स्टार प्रचारकांचा समावेश आहे.

नगरपालिकेप्रमाणे महानगरपालिकेत देखील काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा खा. धानोरकर यांनी व्यक्त केला विश्वास


अजित पवारांनी भाजपचं एेकलं नाही, इतर ठिकाणी परिणाम होणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना या निवडणुकीत मुंबईची जबाबदारी दिल्यास भाजप-राष्ट्रवादीसोबत मुंबईत युती करणार नाही, असे भाजपचे नेते आशिष शेलार व मुंबईचे प्रमुख अमित साठम यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. परंतु अजित पवार यांनी भाजपचे काही न एेकता नवाब मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिलीच, त्याचबरोबर त्यांना स्टार प्रचारक ही बनविले आहे. नवाब मलिकांमुळे मुस्लिम मते राष्ट्रवादीकडे आकर्षित होतील, असं गणित अजितदादांचे आहे. परंतु त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर भाजप मुंबईत युती करणार नाही. इतर ठिकाणी त्याचा परिणाम होऊ शकतो.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, माजी महापौर मिनाक्षी शिंदेंनी दिला राजीनामा


राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रतापराव चिखलीकर पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक-शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, शरद पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे प्रमुख नेते नजीब मुल्ला, प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Exit mobile version