खासदार निधी खर्चात नीलेश लंकेंचेही हात रिकामे ! 14.70 कोटी मिळाले पण खर्च किती ?

Nilesh Lanke-खासदार लंके यांना 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातील 1 कोटी 53 लाख इतकाच निधी विकासकामांवर खर्च केला आहे.

Nilesh Lanke

Nilesh Lanke

Nilesh Lanke MP Fund: विरोधी खासदार असल्याने निधी मिळत नाही. त्यामुळे मतदारसंघातील कामे होत नसल्याचे कारणे सांगून उद्धव ठाकरे सेनेच्या सहा खासदारांनी बंडखोरी केलीय. हे खासदार शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. परंतु बंडखोरी करणाऱ्या सहाही खासदारांनी दरवर्षी मिळत असलेला निधी पूर्णपणे खर्च केलेला नाही. त्यामुळे सहाही खासदार उघडे पडले आहेत. इतर खासदारांनी किती निधी खर्च केला याची माहिती लेट्सअपने जाणून घेण्यास सुरुवात केलीय. आज आपण अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke यांच्या निधी खर्चाबाबत जाणून घेऊया…

भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्याशी राजकीय संघर्ष करून नीलेश लंके हे पहिल्यांदा खासदार झालेले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील जनतेकडून त्यांच्याकडे विकासकामांच्या अपेक्षा आहेत. खासदार म्हणून लंके यांचे तिसरे वर्ष आहे. या कालावधीत खासदार लंके यांना 14 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. त्यातील 1 कोटी 53 लाख इतकाच निधी विकासकामांवर खर्च केला आहे. म्हणजेच मंजूर निधीच्या केवळ दहा टक्केच रक्कम लंके यांच्या निधीतून खर्च झाला आहे.


शिवसेना मराठवाड्यात कमकुवत का होत गेली?, चौकाचौकात झेंडे दिसणाऱ्या पक्षाला का नाकारलं?


लंके यांचे एकही काम पूर्ण नाही

खासदार लंके यांनी मतदारसंघातील 74 विकास कामांचे शिफारस केली होती. त्यातील 74 कामे सुरू आहेत. परंतु एकाही काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यात अहिल्यानगर आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात शिंदेसेनेत गेलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी केवळ 5 टक्केच निधी खर्च केला आहे. वाकचौरे यांना 14 कोटी 70 लाख रुपये निधी मिळालेला आहे. त्यातील 71 लाख रुपये निधी खर्च झाला आहे. त्यांच्या शिफारसीनुसार 135 कामे मंजूर झालेले आहेत. तर तीनच कामे पूर्ण झालेले आहेत. त्या तुलनेत लंके यांचा जास्त निधी खर्च झाला आहे.


एकेकाळी आपला वरचष्मा कायम ठेवणऱ्या काँग्रेसची अवस्था कठीण; विधान परिषदेतून मराठवाड्यात एकही आमदार नाही


खासदाराला निधी किती असतो ?

खासदारांना खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजने (MPLADS) अंतर्गत निधी दिला जातो. वर्षाला पाच कोटी इतका निधी केंद्र सरकारकडून निधी मिळतो. हा निधी सगळ्याच खासदारांना मिळतो. त्यात विरोधी आणि सत्ताधारी असा भेदाभेद केला जात नाही. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध केला जातो. हा निधी थेट खासदाराच्या हातात दिला जात नाही. तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा निधी खर्च केला जातो. खासदार आपल्या मतदारसंघातील आवश्यक विकासकामांची शिफारस करतात. त्यानंतर जिल्हाधिकारी त्या कामांची तपासणी करून मंजुरी देतात. संबंधित सरकारी विभाग किंवा स्थानिक स्वराज्य संस्था कामे पूर्ण करतात. खर्च आणि कामांचा हिशोब प्रशासनाकडे ठेवला जातो.


कोणते कामे करतात ?

खासदार निधीतून रस्ते, पूल, समाजमंदिरे, सभागृहे, क्रीडा सुविधा, सौर ऊर्जा आणि इतर सार्वजनिक पायाभूत सुविधेसाठी निधी खर्च केला जातो.


निधी मागे जातो का ?

खासदार निधी केंद्राला मागे जात नाही. निधी मंजूर झाल्यानंतर तो निधी पाच वर्षाच्या कार्यकाळात कधीही खर्च करता येतो. त्यामुळे अनेक खासदार निवडणूक तोंडावर आल्यानंतर मतदारसंघातील कामे मंजूर करून घेतात. या कामांचे जोरदार उद्घाटने केली जातात. त्यामुळे निवडणुकीत त्याचा फायदा होत असतो, असे गणित अनेक खासदारांचे असते.

Exit mobile version