OBC Reservation : काळजी वाटतेयं, गांभीर्याने लक्ष द्या; हाकेंच्या पत्नीची सरकारला साद

आम्हाला लक्ष्मण हाके यांची काळजी वाटतेयं, गांभीर्याने लक्ष द्या, अशी साद लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांनी सरकारला घातलीयं.

Laxman hake

Laxman hake

OBC Reservation : आम्हाला लक्ष्मण हाके यांची काळजी वाटतेयं, सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी साद ओबीसी नेते (OBC Reservation) लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या पत्नी विजया हाके (Vijaya Hake) यांनी सरकारला घातलीयं. दरम्यान, मागील सात दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतलायं. मागील सात दिवसांपासून हाके यांचं वडीगोद्री गावात आमरण उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांनी लेटस्अपशी बोलताना प्रतिक्रिया दिलीयं.

अहो सर्वज्ञानी, उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला आधुनिक भस्मासूर; चित्रा वाघांचे टीकास्त्र

विजया हाके म्हणाल्या, आम्हाला लक्ष्मण हाके यांची काळजी वाटत आहे. राज्य सरकार त्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नाही. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांची भेट घेतली, मात्र, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज सरकारचं शिष्टमंडळ येणं अपेक्षित होतं, पण आलं नाही. आजचा उपोषणाचा सातवा दिवस आहे, त्यामुळे काळजी वाटत असून सरकाराने गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी साद हाके यांनी घातलीयं.

तसेच लक्ष्मण हाके यांचा विवाहापूर्वीपासूनच संघर्ष सुरु आहे. मागील 20 वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु असून त्यांनी अनेक प्रश्न मांडून उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हाके यांचे वडील शेतकरी असून त्यांनी शेती करुनच आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर लक्ष्मण हाके हे चळवळीत कार्य करीत आहेत. मला व कुटुंबियांना त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचंही हाके यांनी स्पष्ट केलंय.

Aamhi Jarange चित्रपटाचा सेन्सॉर बोर्डशी संघर्ष; दिग्दर्शक म्हणतात समाज सिनेमाच्या पाठीशी…

मागील अनेक दिवसांपासून आरक्षणाबाबतचा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नांचा नेमका काय परिणाम होणार आहे, याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानंतर या प्रश्नामुळे ओबीसी समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचं समोर आलं. यामध्ये फक्त एकाच गटाला फायदा होणार असल्याचं दिसून आलं. एकाच गटाला फायदा होणं हे कितपत योग्य आहे, असा सवालही विजया हाके यांनी उपस्थित केलायं.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी अन्नत्याग केलं असून त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटतआहे, याआधीही त्यांनी उपोषण केलं असून हे त्यांचं दुसरं उपोषण आहे, त्यामुळेच आम्हाला धाकधूक लागली असून सरकारने यावर तत्काळ निर्णय घ्यावा, कारण दोन जीवांचा प्रश्न आहे, दोघेही उपोषणाला बसलेले आहेत, सरकारने याबाबतचा निर्णय पुढे ढकलून चालणार नसल्याचंही हाके यांनी स्पष्ट केलंय.

Exit mobile version