ओबीसी आरक्षण बचावासाठी अंतरवलीत प्राणांतिक उपोषण करणार; लक्ष्मण हाकेंची माहिती
Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) राज्यव्यापी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले. आज त्यांच्या आंदोलनचा चौथा दिवस आहे. अशातच आता राज्य मागास आयोगाचे माजी अध्यक्ष आणि उबाठाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनीही प्राणांतिक उपोषणाची भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी हाके अंतरवलीतच उपोषण करणार आहेत
Mirzapur 3: ‘घायल शेर लौट आया है…’; ‘मिर्झापूर सीझन 3’ धमाकेदार टीझर पाहिलात का?
हाके यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, अंतरवली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे . लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार, असं ते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. मराठा समाजाला सगेसोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू मिळावं, अशी त्यांची सुरूवातीपासूनची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. त्यांच्या मागणीला लक्ष्मण हाके यांनी देखील विरोध करत राज्य मागास आयोगाचा राजीनामा दिला होता. इतर मागासवर्गाच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार पुढे आला तर ओबीसी समाज त्याला तीव्र विरोध करेल, रस्त्यावर उतरून मोर्चा काढू, असा इशाराही हाके यांनी दिला होता.
Rohit Saraf च्या ‘इश्क विश्क रिबाउंड’चा ट्रेलर रिलीज; चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार
दरम्यान, हाके यांनी आता प्राणांतिक उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते अंतरवली सराटीत उपोषण करणार आहे. जरांगे यांचंही उपोषण अंतरवलीतच सुरू आहे. त्यामुळं अंतरवलीत मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
जरांगेंची प्रकती चिंताजनक
आज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समरो आहे. जरांगेंनी चार दिवस कोणत्याही प्रकारचं अन्न-पाणी ग्रहन न केल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.