Rohit Saraf च्या ‘इश्क विश्क रिबाउंड’चा ट्रेलर रिलीज; चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार

Rohit Saraf च्या  ‘इश्क विश्क रिबाउंड’चा ट्रेलर रिलीज; चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार

Rohit Saraf Ishq Vishq Rebound Trailer Release : ‘इश्क विश्क रिबाउंड’ ( Ishq Vishq Rebound ) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला आहे. रोहित सराफ ( Rohit Saraf ) स्टारर चित्रपट त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. यात शंका नाही. रोहितला पहिल्यांदाच रोमँटिक अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट मैत्री, प्रेम यांची मनमोहक कथा दाखवणार आहे.

संविधान बदलणार अन् 400 च्या नाऱ्याने गडबड झाली; लोकसभेतील पिछेहाटीवर शिंदे स्पष्टच बोलले

पहिल्या फ्रेमपासूनच रोहित कमालीचा दिसत असून राघवच्या रूपात तो या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या अभिनेत्याची जोडी पश्मिना रोशनसोबत दिसणार असून जी तिच्या अभिनयात या चित्रपटातून पदार्पण करणार आहे आणि त्यांच्या केमिस्ट्रीमुळे एक वेगळीच गोष्ट अनुभवयाला मिळणार आहे.

ओबीसी आरक्षण बचावासाठी अंतरवलीत प्राणांतिक उपोषण करणार; लक्ष्मण हाकेंची माहिती

निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात नायला ग्रेवाल आणि जिब्रान खान यांच्याही भूमिका आहेत. प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी चित्रपट असणार असून रोहितला बॉलीवूडचा पुढचा रोमँटिक अभिनेता म्हणून त्याची ओळख प्रस्थापित करणार यात शंका नाही.मुख्य अभिनेता म्हणून रोहित सराफसह 21 जून रोजी पडद्यावर त्याची जादू दाखवणार असून त्याला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

वर्क फ्रंटवर.रोहित सराफ ‘मिसमॅच्ड सीझन 3’ मध्ये ऋषी सेखावतची भूमिका पुन्हा साकारणार आहे. त्याच्याकडे आगामी धर्मा प्रॉडक्शनचा ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ हा चित्रपट आहे ज्यामध्ये तो वरुण धवन, सान्या मल्होत्रा ​​आणि इतरांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज