हाकेंना विरोधक मानत नाही, काड्या टाकणारा तो आहे, मफलर आडवा टाकून…; जरांगेंची भुजबळांवर टीका

हाकेंना विरोधक मानत नाही, काड्या टाकणारा तो आहे, मफलर आडवा टाकून…; जरांगेंची भुजबळांवर टीका

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणसााठ मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आंदोलनचा लढा उभारल्यानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणानार्थ लक्ष्मण हाकेंनी उपोषणाचे हत्यार उपसले. दरम्यान, मराठा विरुध्द ओबीसी हा लढा आणखी तीव्र झाला आहे. काल हाकेंनी केलेल्या टीकेला आता मनोज जरागेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) टीका केली.

मनोज जरांगेंनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही. त्यांची बोलायंचही कुवत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. मी कोणत्याही धनगर बांधवाना किंवा कोणत्याही ओबीसी बांधवांना बोललो नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. यापुढे मानणार नाही. मफलर आडवा टाकून काड्या टाकणार तिकडे बसला आहे. काडी टाकून देतो आणि बघतो मजा, अशी टीका जरांगेंनी केली.

Kalki 2898 AD च्या इव्हेंटला दिपिकाची बेबी बंम्पमध्ये हजेरी; प्रभासने दिला हात; पाहा फोटो 

पुढं बोलतांना ते म्हणाले की, आमचा त्यांच्यावर रोष नाही. तुमचा आमचा काही संबंध नाही, असं ओबीसी समाजाला माझं सांगण आहे, असंही जरांगे म्हणाले.

यावेळी बोलतांना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आहे, ते आम्हाला द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवलं जातं. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याआधीच याचिका दाखल करण्यात आली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार अन्यथा 288 उभे करू नाहीतर 288 जणांना पाडून. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे, असे जरांगे म्हणाले.

सगळा अभ्यास वगैरे करूनही आरक्षण मिळणार टीकणार नाही, असं म्हणत असतील तर हा डाव आहे. तसं असेल तर सरसकट आरक्षण द्या. मी जिवंत असेपर्यंत ओबीसींतून आरक्षण घेईन. सगे सोयरेही उडवू देणार नाही आणि मागणीही सोडणार नाही. देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की, आपण असं करायचं आणि मग त्यांच्याच पेंद्यासारख्या मित्राने सांगायचं की, ते उडणार आहे. आम्ही काय कच्चे बसलो का इथं? असंही जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube