Jalna Maratha Protest : मनोज जरागेंनी सोप्या शब्दात दूर केला राज ठाकरेंचा संभ्रम

  • Written By: Published:
Jalna Maratha Protest : मनोज जरागेंनी सोप्या शब्दात दूर केला राज ठाकरेंचा संभ्रम

जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात लाठीहल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले आहे. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सराटी गावाला भेट देत आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सोप्या भाषेत आरक्षणाबाबत राज ठाकरे यांचा झालेला संभ्रम दूर केला. ते राज ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते. (Raj Thackeray Meet’s Manoj Jarange In Jalna)

Raj Thackeray : जालन्यात आंदोलकांना ‘राज’ बळ; लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना वेशीवरच रोखा

राज ठाकरेंचा नेमका संभ्रम काय?

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे राज ठाकरेंचे मत होते. आरक्षणाच्या नावाखाली राजकारणी तुम्हाला केवळ झुलवत ठेवतील त्यामुळे या राजकारण्यांच्या नादी लागू नका असा सल्ला राज ठाकरेंनी आंदोलकांना दिले.

जरांगेंनी फोड करून सांगितली मागणी

दरम्यान, राज ठाकरेंनी ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा सर्वेच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने आरक्षण दिले जाऊ शकत नाही असे सांगितले. त्यावर मनोज जरांगे यांनी नेमकी आपली मागणी कोणत्या आरक्षणासाठी आहे याबाबत फोड करून सांगितले.

महाराष्ट्रात तीन जनरल डायर! एक मुख्य तर, बाकी उप; राऊतांनी तोफ डागली

जरांगे म्हणाले की, ज्यावेळी मराठवाडा निजामाच्या अखत्यारित होता. त्यावेळी मराठा समाजाला कुणबी समाजाअंतर्गत आरक्षण दिले जात होते. एवढेच नव्हे तर, महारााष्ट्राच्या स्थापनेनंतर वर्षभरानंतर आमचा भाग महाराष्ट्रात सहभागी झाला. तोपर्यंत आम्हाला आरक्षण दिले जात होते. हे आरक्षण आम्हाला पुन्हा देण्यात यावे अशी मागणी आमची असल्याचे जरांगे यांनी यावेळी राज यांना सांगितले. त्यानंतर राज यांचा संभ्रम दूर झाला आणि ते याबाबत सकारात्मक झाले.

संजय राऊत कुटुंबाने 2 करोड 15 लाखांची खिचडी खाल्ली, किरीट सोमय्यांचा आरोप

विषय सुटण्यासारखा असेल तर नक्की सोडवू – राज ठाकरे

लाठीहल्ल्यानंतर राज ठाकरेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच वरील मुद्दा समजून घेतल्यानंतर याबाबत लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. यावेळी  समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी हे आंदोलन केल्याचे जरांगे यांनी ठाकरे यांना सांगितले. मराठ्यांचा मूळ उपजीविकेचे साधन शेती असल्याचेही जरांगे यांनी ठाकरेंना सांगितले. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही असे म्हणत विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित सोडवू असे आश्वासन राज ठाकरे यांनी आंदोलकांना दिले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube