मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; शिंदेंनी फोडला महत्वचा नेता
येथील नितीन भोसले यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसा शिंदेगटात प्रवेश केला आहे.
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुकीचं वार आहे. (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळालं होतं. आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख नेते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहे. त्याचबरोबर अनेक पक्षांमध्ये इनकमिंगही पहायला मिळत आहे. अशातच आता नाशिकमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.
नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पक्षप्रवेशाचा परिणान आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
Video : मातोश्रीत दोन किल्ले सरेंडर केल्याचे सांगणाऱ्या संतोष धुरींना राज ठाकरेंनी हाकललं
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र लिंबाळते, नाशिक ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचे प्रशांत ठाकरे, युवराज भोसले, सचिन सोनवणे, प्रसाद आंबेकर, अनुप भोसले, पृथ्वीश भोसले यांचा समावेश आहे. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढली आहे.
नितीन भोसले यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक व माजी महापौर दशरथ पाटील आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील हे दोघेही काही काळापूर्वी भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र उमेदवारी डावलल्यामुळे अशोक मुर्तडक यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.
