Download App

‘स्वामी विवेकानंदांनी जे शिकवले, संघही तेच शिकवतो’, पॉडकास्टमध्ये PM मोदी काय म्हणाले?

PM Modi Podcast Talks About Association With RSS : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्याशी दीर्घ आणि मनोरंजक संवाद साधला. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील प्रवास (RSS) याबद्दल चर्चा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल सांगितले. ते म्हणाले, ‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आरएसएससारख्या प्रतिष्ठित संघटनेकडून जीवनाचे सार (PM Modi Podcast) आणि मूल्ये शिकायला मिळाली. मला एक उद्देशपूर्ण जीवन सापडले. लहानपणी नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकांना उपस्थित राहायला आवडत असायचं. देशाची सेवा करणे, हे माझ्या मनात नेहमीच एकच ध्येय होतेसंघाने मला हेच शिकवले. या वर्षी आरएसएस 100 वर्षे पूर्ण करत आहे. जगात आरएसएसपेक्षा मोठी स्वयंसेवी संघटना नाही, असं देखील मोदींनी पॉडकास्टमध्ये स्पष्ट केलंय.

फडणवीसही औरंगजेबाइतकेच क्रूर शासक, दोघांचाही कारभार एकसारखा…हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आरएसएस समजून घेणं सोपं काम नाही. त्याची कार्यक्षमता समजून घेतली पाहिजे. ते त्याच्या सदस्यांना जीवनात उद्देश देते. आरएसएस शिकवते की राष्ट्र हेच सर्वस्व आणि समाजसेवा हीच देवाची सेवा (PM Modi News) आहे. आपल्या वैदिक संतांनी आणि स्वामी विवेकानंदांनी जे शिकवले आहे, तेच संघ देखील शिकवतो. शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी आरएसएसच्या काही सदस्यांनी विद्या भारती नावाची संघटना सुरू केली. तो देशभरात सुमारे 25 हजार शाळा चालवतो. या शाळांमध्ये एका वेळी 30 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आरएसएसची कामगार संघटना ‘कामगारांनो, जगाला एकत्र करा!’ असा नारा देते. चा नारा देतो.

नरेंद्र मोदी म्हणाले की, लहानपणापासूनच काहीतरी करत राहणं, हा माझा स्वभाव होता. ‘आमच्या घरी एक माणूस येत असे, जो डफलीसारखे काहीतरी घेऊन देशभक्तीपर गाणी म्हणत असे. त्याचा आवाज खूप चांगला होता. त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी झाले. मी वेड्यासारखा जाऊन त्यांचे ऐकत असे. मी रात्रभर देशभक्तीपर गाणी ऐकत असे. मला ते खूप आवडायचे. परंतु हे असं का घडायचं, हे माहित नव्हतं असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. अशाप्रकारे मी संघात आलो. त्यातून मला चांगले संस्कार मिळाले. संघाच्या लोकांनी मला खूप काही शिकवले, असं देखील पीएम मोदी म्हणाले आहेत.

मोठी बातमी! खुलताबादमध्ये पोलीस प्रशासन हायअलर्टवर, औरंगजेबाच्या कबरीजवळ जाण्यास…

या पॉडकास्टदरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारताच्या संस्कृतीचे आणि शांततेच्या महत्त्वावर विशेष लक्ष केंद्रित केलंय ते म्हणाले की, जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते. कारण भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे.

पंतप्रधान मोदींनी भारताच्या जागतिक राजनैतिकतेबद्दल भूमिकेबद्दलही सांगितलं की, मी जेव्हा मी जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन करतो,तेव्हा तो मोदींचा हात नसून 1.4 अब्ज भारतीयांचा हात असतो. ते म्हणाले की माझी आई खूप कष्ट करायची. वडिल देखील अत्यंत मेहनती आणि शिस्तप्रिय होते. वडिल चामड्याचे बूट घालायचे, त्याच्या आवाजावरून गावातील लोक त्यांच्या पावलांचा आवाज ओळखायचे, असं देखील मोदींनी म्हटलंय.

follow us