Download App

‘…तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही’; आंबेडकरांचा टोला…

Prakash Ambedkar : मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका ठेवा, नाहीतर आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत अशा भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नसल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. नागपुरात आज मनस्मृती दिनानिमित्त आयोजित स्त्रीमुक्ती दिन परिषदेत आंबडेकर बोलत होते.

‘बारामतीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमच’; चंद्रशेखर बावनकुळेंनी ठणकावूनच सांगितलं

आंबेडकर म्हणाले, कोणी म्हणतंय मी 23 जागा लढणार, तर कोणी म्हणतंय अमुक जागा लढवणार. आम्ही त्यांना म्हणतोयं की पहिल्यांदा जागा सोडा. पक्ष वाढवायचा आहे की मोदी घालवायचा आहे? मोदी घालवायचा असेल तर 2-4 जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, अशा भूमिकेवर राहिलात तर मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही, अन् तुम्ही तिहार जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टोलेबाजी आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

काँग्रेसवर डोनेट फॉर देश मोहीम चालविण्याचा वेळ का आली ? काँग्रेस व भाजपकडे नक्की किती पैसा?

दरम्यान, राज्यात पुढील काही दिवसांतच आगामी निवडणुकी येऊ घातल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. एकीकडे भाजपकडून राज्यातील विविध मतदारसंघात चाचपणी सुरु आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. इंडिया आघाडीत राज्यातील सर्व विरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात आली आहे.

‘पवारांवर परिवारवादाचं लेबल नव्हतं’ अजितदादांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं सणसणीत उत्तर

इंडिया आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचा समावेश आहे. इंडिया आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव देण्यात आला असल्याचं बोलंल जात आहे. मात्र, अद्याप इंडिया आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची युती झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यावरुन प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर टोलेबाजी केलीयं.

भाजपच्या आमदार-खासदारांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय का? अतुल लोंढेंचा सवाल

आंबेडकरांचं आगमन अन् स्टेज कोसळलं :
या परिषदेसाठी सोमवारीच स्टेजच काम करण्यात आलं होतं. प्रकाश आंबेडकरांचं आगमन होण्याआधी स्टेजचा मागील भाग अॅंगलसह कोसळल्याची घटना यावेळी घडली. या घटनेमुळे परिषदेत एकच धावपळ उडाल्याचं दिसून आलं होतं. घटनेच्या चित्रिकरणासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींकडूनही मोठी धावपळ करण्यात आली मात्र त्यांनी मज्जाव करण्यात आल्याचं समोर आलं. घटनेनंतर तत्काळ सुजात आंबेडकरांनी पाहणी करत पुन्हा स्टेजच्या कामाची सुरुवात करण्यास सांगितलं.

Tags

follow us