Prakash Ambedkar : मविआत जाण्याबाबत आंबेडकर अजूनही प्रचंड आशावादी; थेट डेडलाइन सांगितली !

Prakash Ambedkar On MahaVikas Agadi : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) हे मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित होते. त्यांनी भाजपविरोधात जोरदार भाषणही केले. परंतु त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गटावर) विरोधात भाष्य केले […]

'Prakash Ambedkar : मविआत जाण्याबाबत आंबेडकर अजूनही प्रचंड आशावादी; तिन्ही पक्षांना कधीपर्यंत डेडलाइन ?

'मविआ' अल्टिमेटमच्या बातम्यांत तथ्य नाही; वंचित आघाडीकडून स्पष्ट खुलासा

Prakash Ambedkar On MahaVikas Agadi : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याबाबत अनेक चर्चा झाल्या आहेत. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) हे मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेला उपस्थित होते. त्यांनी भाजपविरोधात जोरदार भाषणही केले. परंतु त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे गटावर) विरोधात भाष्य केले आहे. परंतु जागा वाटपाचा वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी महाविकास आघाडीचे ( MahaVikas Agadi) दरवाजे बंद झाले असल्याचे बोलले जात आहे. तसे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहेत. परंतु आता प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते अजूनही महाविकास आघाडीत जाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

Delhi Liquor Scam: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना सात दिवसांची ईडी कोठडी

प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी मी अजूनही तयार आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. त्या अटी मी मविआच्या नेत्यांबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत बोलवून दाखविल्या आहेत. भाजपविरोधात काय-काय बोलायचे हे ठरविले पाहिजे ही माझी पहिली अट होती. त्यानंतर निवडणुकीचा अजेंडा ठरविणे हे दुसरी अट होती. त्याच मराठा आणि ओबीसी वादही मिटला पाहिजे, या मताची मी होतो. परंतु त्यावर निर्णय झालेला नाही.

धंगेकरांचा कॉंग्रेस नेत्यांवर विश्वास नाही, त्यामुळेच बापटांचा फोटो वापरण्याची वेळ; गौरव बापटांचे टीकास्त्र

महाविकास आघाडीत येण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पंधरा जागांबाबत एक कागद दिला होता. त्या जागांबाबत चर्चा होणार होती. परंतु तो कागद अद्याप माझ्यापर्यंत आलेला नाही. ते आम्हाला मान-सन्मानाने घेणार असतील तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवचच्या दिवशी आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ, असे भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रत्येकाला बारा जागा घेऊ
वंचित महाविकास आघाडीत आल्यास आघाडीत चार पक्ष होतील. तेव्हा प्रत्येक पक्षाला प्रत्येकी बारा जागा घेऊ असे सांगितले. परंतु त्याला हवातसा प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला महाविकास आघाडी घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे दोन वेळेस तयार झाले. तसे त्यांचे प्रयत्न होते. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीने काहीच प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही आंबेडकरांनी व्यक्त केली.

Exit mobile version