Download App

मी आता आणि भविष्यातही पवारांसोबतच; वडिलांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांवर रोहिणी खडसेंचे स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Rohini khadse clarification she will remain in ncp sharad-pawar group: जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते व विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा स्वगृही भाजपात (BJP) येणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत खडसे यांचा भाजप प्रवेश होणार आहे. खडसे हे आपली मुलगी रोहिणी खडसे (Rohini Khadse) खडसे यांच्यासह भाजपात येतील, असे बोलले जात आहे. परंतु ही शक्यता शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे.

लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश

मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे. मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे.
मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच राहणार आहे. लढ़ेंगे और जीतेंगे असे ट्वीट रोहिणी खडसे यांनी केले आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतःबाबत हे ट्वीट केले आहे. पण आपले वडील एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार किंवा नाही, याबाबत मात्र त्यांनी ट्वीटमध्ये काहीच म्हटलेले नाहीत.

Lok Sabha Election: मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, फडणवीसांना भेटणे नडले !

गेल्या महिन्याभरापासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही भाजपात येणार असल्याची चर्चा आहे. खडसे यांनी अनेकदा या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांत वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ खडसे हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. ते गृहमंत्री अमित शाह यांना भेटले आहेत. या भेटीत खडसे हे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. खडसे येत्या 8 किंवा 10 एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर रोहिणी खडसे याही भाजपमध्ये पुन्हा येतील, असे बोलले जात आहे. परंतु आता रोहिणी खडसे यांनी स्वतःच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज