मतदारसंघात या म्हणत भावजयीच्या बद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहिणी खडसेंची टाळाटाळ

मतदारसंघात या म्हणत भावजयीच्या बद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहिणी खडसेंची टाळाटाळ

Rohini Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ( Rohini Khadse ) भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लेकसभेसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या त्यांच्या भावजयी रक्षा खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता रोहिणी खडसे यांची भंबेरी उडाल्याचा पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळत स्वतःची सुटका करून घेतली. त्या पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होत्या.

मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर एकत्र, पंकजांच्या उमदेवारीवर धनंजय मुंडे काय म्हणाले?

पत्रकारांनी त्यांना रावेरचा विकास झाला की नाही. असा प्रश्न विचारला होता. यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, रावेरचा विकास झाला आहे की नाही याबद्दल तुम्ही संबंधित उमेदवाराच्या इंटरव्यू घेतला तर चांगलं होईल कारण मी निगेटिव्ह सांगितलं तरी किंवा पॉझिटिव्ह सांगितले तरी तुम्ही टीका करणार मात्र तुम्ही मतदारांना विचारलं ते तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ शकतील. तसेच तुम्ही माझ्या मतदारसंघात या मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते विकास झाला आहे तुम्ही त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की माझ्या मतदारसंघात या.

‘लेकरांसाठी गुन्हे अंगावर घ्या पण..,’; जरांगेंकडून मराठा बांधवांना आवाहन

दरम्यान आज रोहिणी खडसे यांनी पुण्यातील मोदी बाग या ठिकाणी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. रावेर मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांना शरद पवार साहेबांची भेट घ्यायची होती. म्हणून ही भेट असल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपसह महायुतीवर जोरदार निशाणा साधला. मात्र ज्यावेळी त्यांच्या भावजयी असलेल्या रक्षा खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता रोहिणी खडसे यांनी प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करत स्वतःची सुटका करून घेतल्याचे पाहायला मिळाले.

रावेरमध्ये खडसे विरूद्ध खडसे लढत नाहीच…

आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने रावेरमध्ये रोहिणी खडसे किंवा एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) यांना उमेदवारी मिळू शकते अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचे बोलला जात होतं मात्र या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube