Download App

उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली, आता त्यांचं दुकान बंद….; सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar : काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर इंडिया आघाडीची (India Alliance) भव्य सभा झाली. या सभेला संबोधित करतांना राहुल गांधींसह विरोधकांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) तमाम हिंदू भगिनींनो असं म्हणण्याचा उल्लेख टाळत भाषणं ठोकलं. त्यावर आता भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Train Derail : साबरमती-आग्रा सुपरफास्टची मालगाडीला धडक, 4 डब्बे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरू 

आज माध्यमांशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाराच घेतला. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा धोका ओळखला होता. त्यामुळं त्यांनी कॉंग्रेससोबत जायची वेळ आली तर मी शिवसेना बंद करेल, अशी भूमिका घेतली होती. ते आपल्या तत्वासाठी जगले. सत्तेसाठी त्यांनी कॉंग्रेसची हातमिळवणी केली नाही. आपल्या भाषणात तमाम हिंदू बांधव भगिनींनो असं बाळासाहेब म्हणायचे. मात्र, तमाम हिंदू बांधव भगिनींनो असं म्हणणं उद्धवजींनी टाळलं. असंगाशी संग केल्यानं त्यांना आता भाषा बदलावी लागले. आता त्याचं दुकान बंद व्हायची वेळ आली, अशी टीका मुनगंटीवारांनी केली.

विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा! पुढील 48 तासात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस 

विरोधकांना अल्झायमर झाला
ते म्हणाले, भाजपावर टीका करून मतदान घेता येईल, असं विरोधकांना वाटतं. पण, ते सत्तेत असतांना त्यांनी काय केलं? त्यांनी देशाची काय प्रगती केली? यावर ते काहीच बोलत नाहीत. मोदीजी आपल्या भाषणात केलेल्या विकासावर बोलतात. मात्र, विरोधक फक्त टीका करतात. रस्ते, गरीबांसाठी अनेक योजना, शेतकरी हिताचे निर्णय हा मोदींनी केलेला विकास त्यांना त्यांना दिसला नाही. स्वत: केलेल्या घोटाळ्यांचे आरोप विरोधक मोदींच्या नावावर खपवतात, त्यांना अल्झायमर झाला आहे. त्याचं कौतुक करण्यासाठी काय त्यांच्याकडे दिव्यदृष्टी आणि दुरदृष्टी आहे ? खुर्ची एक खुर्ची, खुर्ची दुणे खुर्ची एवढीच त्याची राजकारणाची व्याख्या असल्याची टीका मुनगंटीवारांनी केली.

20 मार्चला तिसरी यादी जाहीर….
भाजपनं आतापर्यंत लोकसभेच्या दोन याद्या जाहीर केल्या. तिसरी यादी कधी जाहीर होईल, यविषयी विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, तिसरी यादी येत्या 20 मार्चच्या आत घोषित होईल. मात्र, महायुतीतील घटक पक्षांनी आापल्या जागा जवळपास निश्चीत केल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी ईव्हीएम शिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. EVM काँग्रेसने आणला आणि त्यावर तेच संशय व्यक्त करतात. याचा अर्थ स्वता:वरच आरोप करणं आहे. जिंकले की मोदींचा पराभव आणि हरले की EVM वर ठपका ठेवतात, ही त्यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका मुनगंटीवारांनी केली.

follow us

वेब स्टोरीज