Sunil Tatkare ON Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 2014 पासून धुसपुस सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते. अजित पवारांनी 2019 मध्ये जे बंड केलं, त्यामागे तटकरेंचा हात होता, त्यांनीच पवार कुटुंब फोडला, असा गौप्यस्पोट करत शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तटकरेंवर टीका केली. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, अशी टीका त्यांनी केली.
‘राम मांसाहारी’ म्हणताच दादा गट आक्रमक; ठाण्यात आव्हाडांचा निषेध
आज माध्यमांशी बोलतांना तटकरे यांना आव्हाडांनी केलेल्या टीकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत. २०१९ मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते, तर ते सरकार टिकले नसते. सर्वोच्च न्यायालयाचा निकालावर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय झाला नसता आणि तो सिक्रेट प्लॅनने झाला असता तर कदाचित पहिल्या दिवशीच सरकार पडू शकलं असतं. त्यामुळे आव्हाडांचा दावा हा निखालस खोटा आहे, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. निराशेच्या गर्तेत सापडलेली माणसं आणि आयुष्यभर खोटं बोलून स्वत:चे राजकीय महत्व वाढवलेली माणसं यापेक्षा काय बोलणार आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, असा टोलाही तटकरेंनी लगावला.
टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम
अजित पवार यांनी संघटनेत काम केले. त्याचा प्रत्यंतर अनेकवेळा पहायला मिळाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री केले ते चूक की बरोबर हे काळाच्या ओघात सिध्द झाले आहे. याहीपेक्षा अजित पवार विरोधी पक्षनेते झाले ते बहुसंख्य आमदारांनी मागणी केली होती म्हणून. त्याहीपुढे अजित पवार यांचे ऐकले नाही म्हणूनच ५३ पैकी ४३ आमदार आज दादांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य संघटनेत, विधीमंडळात काय आहे हे झारखंडचे एक आमदार, नागालँडचे सात आमदार पाठीमागे उभे आहेत यावरून दिसून येते. अजित पवारांची ताकद आता स्पष्ट झाली आहे, असंही तटकरे म्हणाले.
दरम्यान, मार्च महिन्यात लोकसभा निवडणुक जाहीर होईल. या निवडणुका सात टप्प्यात होतील. त्याअगोदर तिन्ही पक्षाचे कार्यक्रम घेतले जातील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे १४ जानेवारीनंतर जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि घटक पक्षांना घेऊन ही चर्चा पूर्ण होईल, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने परभणी आणि धाराशिव या दोन जिल्हयात दोन मोठे मेळावे घेण्यात येणार आहेत. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मी आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे व इतर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. शिवाय, १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात एकाच वेळी महायुतीचे मेळावे होणार असून यावेळी तालुका, जिल्हा पदाधिकारी, त्यामध्ये महिला, युवक व सेलचे पदाधिकारी म्हणजे किमान १२०० ते १५०० प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्यात आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रमुख नेते मार्गदर्शन या मेळाव्यात करतील, असंही तटकरे म्हणाले.