‘राम मांसाहारी’ म्हणताच दादा गट आक्रमक; ठाण्यात आव्हाडांचा निषेध
Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे.
‘तुमचे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर…’; अंगणवाडी सेविकांच्या मोर्चातून ठाकरेंचा हल्लाबोल
जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाबाबत रामाबाबत मोठं विधान केलं. या विधानांतर ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत निषेध केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांचं घरच गाठलं आहे. आव्हाडांच्या घरासमोरच कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केल्याचं पाहायला मिळालं आहे.
Lok Sabha 2024 : ‘होय, लोकसभा लढणारच!’ राणी लंकेंच्या घोषणेने नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट
या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी तत्काळ जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी धाव घेत कार्यकर्त्यांना रोखलं आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजीही केली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून यावेळी आव्हाडांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी श्रीरामाची प्रतिमा हातात घेत आरती करणार होते मात्र, पोलिसांनी त्याआधीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आल्यानंतर आव्हाडांन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या घरावर आता अजित पवार यांच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला. मोजून चारच जण होते. श्री रामाचा इतिहास माहित नसलेल्या औलादींना श्री रामाचा इतिहास समजून सांगावा लागणार असल्याचं आव्हाड म्हणाले आहेत.
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
काय म्हणाले होते आव्हाड?
राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, असंही आव्हाड म्हणाले.
‘पंचक’ रिलीज होण्यापूर्वी माधुरी दीक्षित पतीसोबत सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा फोटो
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे सुरु आहे. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आव्हाड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत होते. अनेक विषयांवर भाष्य करत असताना आव्हाड यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला.