‘राम शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’; जितेंद्र आव्हाडांचा दावा

‘राम शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी’; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Jitendra Awhad On Ram : राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ऐन राम मंदिर (Ram temple) सोहळा होत असताना हे विधान केल्यानं केल्यानं नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पण आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे आव्हाड यांनी सांगितल आहे.

प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरेंनीच पवारांच घर फोडलं; जितेंद्र आव्हाडांची जहरी टीका 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे शिबिर शिर्डी येथे सुरु आहे. या शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आव्हाड कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत होते. अनेक विषयांवर भाष्य करत असताना आव्हाड यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी त्यानी रामाविषयी मोठं विधान केलं. राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना ते केवळ कंदमुळे खात होते का? ते शाकाहारी कसे असू शकतात, तर नाही. ते मांसाहार देखील करत होते, असं आव्हाड यांनी केलं. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जातोय, असंही आव्हाड म्हणाले. हा विषय संपल्यानंतर आव्हाड यांनी आपला भाषण सुरूच ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मुद्यावर भाष्य केलं.

PM मोदींच्या सेल्फी बूथसाठीच्या खर्चाची माहिती दिल्यानं रेल्वे अधिकाऱ्याची बदली, कॉंग्रेसचा आरोप 

ऐन राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी हे विधान केल्याने हा विषय चांगलाच पेटणार आहे. दरम्यान, भाषण संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारले असताना ते या विधानावर ठाम होते. ते म्हणाले, “प्रभू राम हे क्षत्रिय होते. ते मांसाहारी होते, या मतावर मी ठाम आहे”, असं त्यांनी ठासून सांगितलं.

आव्हाड यांच्या विधानानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी तात्काळ प्रतिक्रिया दिल्या आहेत. आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखवण्याचे काम केल आहे. आव्हाड यांनी हा शोध कुठून लावला? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. आव्हाड यांनी हिंदूच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. ते उद्धव ठाकरे यांना चालणार आहे का? असाही सवाल कदम यांनी केला.

प्रभू रामचंद्र हे कंदमुळ आणि फळ खाऊन आपली दिनचर्या करत होते. रामामुळे राक्षसांना जो त्रास होत होता तो त्रास आव्हाड यांना होतोय का? असा सवाल काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube