Download App

Sangli Loksabha : सांगलीची जागा ठाकरे गटाला कशी गेली? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

Sanjay Raut On Sangli Loksabha : लोकसभा निवडणूक (Loksabha Election) तोंडावर असतानाच महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागेवरुन मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसच्या नेत्यांकडून नाराजीचा सूर आवळला आहे. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) हे दिल्लीत हाय कमांडशी चर्चा करण्यासाठी गेले असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगली लोकसभेबाबत मोठं विधान केलं आहे. पुढील दोन दिवसांत सांगली लोकसभेचा विषय संपणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे. संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

“सांगली शिवसेनाच लढणार” राऊत ठाम; काँग्रेस नेत्यांची दौऱ्याकडे पाठ; वादाची ठिणगी पडलीच

संजय राऊत म्हणाले, सांगली लोकसभेच्या जागेबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केलेल्या भावनेचा आम्ही आदर करीत आहोत. महाविकास आघाडीत असताना आण्ही कोल्हापुर, रामटेक, अमरावतीची आमची हक्काची जागा काँग्रेससाठी सोडली आहे. या मतदारसंघात आमचे विद्यमान खासदार असतानाही आम्ही काँग्रेससाठी जागा सोडली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा होती की, ठाकरे गटाने सांगलीची जागा लढवावी, त्यामुळेच कोल्हापुर लोकसभेच्या जागेच्या बदल्यात आम्ही सांगलीची जागा लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

RBI Policy : कर्जदारांसाठी मोठी बातमी! कर्ज हप्त्याचा व्याजदर ‘जैसे थे’; EMI वाढणार नाही

सांगलीच्या जागेबाबत वरिष्ठांच्या पातळीवर निर्णय झाल्यानंतरच उमेदवार दिला आहे. पुढील एक दोन दिवसांत काँग्रेसच्या नेत्यांची भावना शांत झालेली दिसेल. महाविकास आघाडीत विश्वजित कदम, विशाल पाटलांची महत्वाची भूमिका आहे. विशाल पाटलांसाठी पुढील काळात शिवसेना पुढाकार घेईल. याबाबत आम्ही एक प्रस्ताव दिल्लीला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला आहे. त्यावर आज उद्या चर्चा होईल अन् विषय संपणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये बजरंग सोनवणेच तर भिवंडीत म्हात्रेंना उमेदवारी

‘चारसो पार’चा नारा भंपक :
भाजपकडून चारसो पारचा फसवा नारा देण्यात येत आहे. हा नारा भंपक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुकीच्या निकालानंतर हे समजणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राची गेमचेंजिंगची जबाबदारी असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल राज्यांची महत्वाची भूमिका असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसून भाजप सत्तेत येणार नसल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून या जागांपैकी महाविकास आघाडी 35 पेक्षा अधिक जिंकणार असल्याचाही दावा संजय राऊतांनी यावेळी केला आहे.

follow us