‘…तेव्हापासून महाराष्ट्राला वाळवी लागलीयं’; संजय राऊतांची खोचक टोलेबाजी
Sanjay Raut On BJP : भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागलीयं, अशी खोचक टोलेबाजी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज सजंय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टोलेबाजी केली आहे.
Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील ‘या’ ठिकाणी होणार नवे 3 उड्डाणपूल…
संजय राऊत म्हणाले, सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे. ज्या विद्या प्रतिष्ठान येथे हा रोजगार मेळावा होत आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. सरकारचा एक प्रोटोकॉल असतो कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवत असेल त्या ठिकाणचे विद्यमान खासदारांना आमंत्रण दिले जाते. तो सरकारी कार्यक्रम आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या घरातल्या लग्नाचा कार्यक्रम नाही. हे हास्यास्पद आहे, हे कसले राजकारण असून भाजप सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली असल्याची टोलेबाजी संजय राऊतांनी केली आहे.
तसेच शरद पवार यांना आमंत्रण दिलं नाही तरीही त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे आंमत्रण दिले आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सरकारमध्ये आमदार, खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला कार्यक्रमात बोलवायचेच नाही का? जो महारोजगार मेळावा आहे तो तुमच्या माता या पिताश्री यांचा आहे का सरकारचा आहे? असे सवालही संजय राऊतांनी केले आहेत.
महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे?
सध्या अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण भाजपचे देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे. गटारातील राजकारण हे आतापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे ,हे याआधी कधीच नव्हते. आपल्याच आमदारांना निधी द्यायचा, विरोधी पक्षातील आमदारांना निधी द्यायचा नाही. आमदाराशी तुमचा वाद असेल ,मात्र जनतेचा काय? हा कोणता खेळ चालला या राज्यात. पैसे काय तुमच्या झाडाला आले आहेत का ? तुमच्या झाडाला खोके लागलेत का? वर्षा, सागर बंगला ,देवगिरी ,बारामती बंगल्यांवर झाडाला पैशांचे खोके लागले आहेत का? केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
आम्ही जागावाटपाचे आकडे एकत्रच जाहीर करणार :
महाविकास आघाडीत जागावाटपा संदर्भात सकारात्मक निर्णय होईल अनेकांनी आपले प्रस्ताव दिले आहेत. आम्ही एकत्र बसून आकडे जाहीर करू, मात्र कोण येत नवीन नवीन आकडे देते त्याच्याशी आमचा संबंध नाही. वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याशिवाय जागावाटप होणार नसल्याचंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.