Download App

वायगावच्या गणपतीचा आशीर्वाद घेत यशोमती ठाकूर करणार प्रचाराचा शुभारंभ; पंधरा दिवस धुमशान

Yashomati Thakur : वायगावच्या गणपतीचा आशीर्वाद घेत कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर करणार प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

  • Written By: Last Updated:

 

Yashomati Thakur : विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. सायंकाळी सर्वच मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता बहुतेक राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून प्रचारफेरी आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातोय. उद्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूरही (Yashomati Thakur) प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

प्रा. वामन केंद्रे यांची निशुल्क “मॅजिक ॲाफ ॲक्टींग” ही कार्यशाळा 8,9 व 10 नोहेंबर रोजी 

वायगावच्या गणपतीचा आशीर्वाद घेत यशोमती ठाकूर करणार प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर लढतीचं चित्र स्पष्ट झालं. आता उमेदवारांना प्रचारासाठी पंधरा दिवस मिळणार आहेत. उमेदवार प्रचारसभा, पदयात्रांचा धडाका लावणार आहेत. यशोमती ठाकूर या देखील उद्यापासून प्रचाराला सुरूवात करत आहे. यशोमती ठाकूर यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला. दरवेळेस सारखं यावेळेसही आपण निवडणुक प्रचाराची सुरूवात गणपतीरायाचं दर्शन घेऊन करतोय. उद्या (5 नोव्हेंबर) सकाळी 8 वाजता वायगावला यावं, आपण गणपतीला अभिषेक करून प्रचाराचा शुभारंग करतोय,असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

समित कक्कड यांचा नवा चित्रपट ‘रानटी’, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 

यशोमती ठाकूर यांचा उद्या (5) नोव्हेंबरला वायगाव, आष्टी, टाकरेखडा संभू, साऊर, पूर्णानगर असा प्रचार दौरा आहे. सकाळी 8 वाजता त्या वायगावला जाऊन गणपती बाप्पाचा अभिषेक करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता आष्टी, 2 वाजता टाकरखेडा संभू, 4 वाजता साऊर, तर सायंकाळी 6 वाजता पूर्णानगर या गावांना भेटी देऊन त्या मतदारांशी संवाद साधणार आहे.

दरम्यान, यशोमती ठाकूर या केवळ आमदार किंवा माजी पालकमंत्री इतक्या पुरत्याच मर्यादित नाहीत. गेल्या 15 वर्षात राजकारणात त्यांनी घेतलेल्या भरारीमुळं त्यांची प्रदेश पातळीवर काँग्रेसच्या नेत्या म्हणून गणना झाली. यशोमती ठाकूर यांची तिवसा मतदारसंघातील उमेदवारी म्हणजे भापजसमोर मोठं आव्हान आहे.

2009 पासून यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्यात यश मिळणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजेश वानखडे यांना रिंगणात उतरवलं. यशोतमी ठाकूर यांच्या सारख्या तगड्या उमेदवारसमोर राजेश वानखडेंचा टिकाव लागणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us